वाई तालुक्यातील डोंगरदऱ्यांतून वणवामुक्तीचा जागर, गावोगावी रॅली, माहितीपत्रिकेचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 02:34 PM2022-02-14T14:34:04+5:302022-02-14T14:37:17+5:30

वाईच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगररांगा असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वनवा लागून निसर्गाचे नुकसान होत असते.

Awareness against forest from the hills of Wai taluka | वाई तालुक्यातील डोंगरदऱ्यांतून वणवामुक्तीचा जागर, गावोगावी रॅली, माहितीपत्रिकेचे वाटप

वाई तालुक्यातील डोंगरदऱ्यांतून वणवामुक्तीचा जागर, गावोगावी रॅली, माहितीपत्रिकेचे वाटप

googlenewsNext

पांडुरंग भिलारे

वाई : वाई वन विभाग व तालुक्यातील सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात वणवा मुक्त डोंगर योजना घोषित केली आहे. यासाठी काल, रविवारी सर्वोदय सेवा ट्रस्ट, युवा वारकरी संघटना व वनविभागाच्यावतीने वाईच्या पश्चिम भागात वणवा जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी डोंगराकडेच्या गावांमध्ये वनवाविरोधातील जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रिकेचे वाटप करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक मांढरे, सर्वोदय ट्रस्टचे अध्यक्ष संजय जेधे, उपाध्यक्ष प्रकाश वाडकर, सचिव संतोष वाडकर, खजिनदार ज्ञानदेव वाशिवले, रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक बागडे, काळेश्वरी ट्रस्टचे ज्ञानदेव सणस, पर्यावरणप्रेमी प्रशांत डोंगरे, रामदास राऊत, संजय चौधरी, वनपाल संग्राम मोरे, सुरेश सूर्यवंशी, वानरक्षक कुमार खराडे, करुणा जाधव यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले होते. 

जागतिक पातळीवर पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पर्यावरणाचे संतुलन ढासळल्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ, गारपीट, हिमवर्षाव, जागतिक तापमान वाढ यासह अशा प्रकारचे नैसर्गिक संकटांचे प्रमाण वाढले आहे. निसर्गाचे संतुलित चक्र तुटल्यामुळे दुष्परिणाम होत आहेत. यासाठी वाईच्या पश्चिम भागात वनवा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

वाईच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वनवा लागून निसर्गाचे नुकसान होत असते. याबाबत जनजागृतीसाठी मेणवली ते वासोळे या २५ गावात ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये प्रत्येक गावात भित्तीपत्रके लावण्यात आली. डोंगरा कडच्या गावामध्ये प्रत्येक घरोघरी वनवा विरोधी माहितीपत्रके वाटण्यात आली. 

वाई व सामाजिक संस्था वाई यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या गाव व डोंगर वणवा मुक्त राखावे सदर योजनेअंतर्गत जुलै महिन्यात सर्व गावची छाननी समिती मार्फत मूल्यांकन करून विजयी गावास रोख रक्कम स्मृतीचिन्ह, प्रत्येक घरासाठी एक फळझाड, गावातील शाळेतील ग्रंथालयात पुस्तके व ग्रामपंचयतीला खेळाचे साहित्य बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर यांनी दिली. 

निसर्गाचा प्रश्न गंभीर आहे. वणव्यामध्ये वन्य प्राणी, पक्षी, कीटक विविध प्रकारच्या वृक्षाच्या दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गांवर आहे. वन्यप्राण्यांची शिकार करणा-यांवर तसेंच डोंगरांना वणवा लावणाऱ्या विरोधात वनविभागामार्फत कठोर कारवाई करून वणवा लावणाऱ्यास कठोर कारवाई केली पाहिजे  - संजय जेधे, अध्यक्ष सर्वोदय सेवा ट्रस्ट

Web Title: Awareness against forest from the hills of Wai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.