बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:49+5:302021-04-10T04:38:49+5:30

: जिल्हाधिकारी लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी ...

Babasaheb Ambedkar Jayanti should be celebrated simply | बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी

बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी

Next

: जिल्हाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमून तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजतादेखील एकत्र येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात, परंतु या वर्षी कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजण्यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

या वर्षी कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे प्रभातफेरी, बाइक रॅली, मिरवणुका जयंतीनिमित्त काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एका वेळी ५ पेक्षा जास्त नसावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करून परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी.

दरवर्षी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु या वर्षी कोविड विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जयंतीनिमित्त करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाचे केबल नेटवर्कद्वारे अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पूर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापी आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

राज्यातील कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरून व या कार्यालयाकडून आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करण्याबाबत बंधनकारक राहील.

Web Title: Babasaheb Ambedkar Jayanti should be celebrated simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.