गिरवीकरांचा ‘हात’ आगवणेंच्या पाठीवर

By Admin | Published: October 23, 2014 09:01 PM2014-10-23T21:01:08+5:302014-10-23T22:48:58+5:30

फलटणचे राजकारण : काकडेंपेक्षा मिळाली जादा मते

On the back of the 'hand' of the mortgages | गिरवीकरांचा ‘हात’ आगवणेंच्या पाठीवर

गिरवीकरांचा ‘हात’ आगवणेंच्या पाठीवर

googlenewsNext

वाठार निंबाळकर : विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या गिरवी गटात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दिगंबर आगवणे यांची केलेली पाठराखण, तर माजी आमदार चिमणराव कदम यांच्या गिरवी गावात त्यांनी उभे केलेले पोपटराव काकडे तीन क्रमांकावर, असे चित्र पाहायला मिळत आहे.
माजी आमदार चिमणराव कदम यांच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या पोपटराव काकडे यांना मत द्यायचे की काँग्रेसचे उमेदवार दिगंबर आगवणे यांना द्यायचे. मात्र, झालेल्या मतदानामध्ये राष्ट्रवादी ५६२ मते, काँग्रेसला २,२७५ तर स्वाभिमानीचे पोपटराव काकडे यांना १७७ मते पडली. धुमाळवाडीत राष्ट्रवादीला १२२ मते, काँगे्रसला ५४३ मते, स्वाभिमानीला २४ मते पडली.
बोडकेवाडीत राष्ट्रवादीला १२८ मते, काँग्रेसला २४५ मते पडली, दरेवाडीत राष्ट्रवादीला १७० मते, काँग्रेसला १६० मते, उपळवेत राष्ट्रवादीला २१९ मते, काँग्रेसला २४१ मते उपळवेत दुसऱ्या बुथवर राष्ट्रवादीला २५५, तर काँग्रेसला २९२ मते पडली.
वेळोशीत राष्ट्रवादीला ३११ मते, काँग्रेसला १३० मते, तरडफगावात राष्ट्रवादीला ६८९ मते तर काँग्रेसला १५८ मते पडली. मानेवाडीत राष्ट्रवादीला ११५ मते, काँग्रेसला १२१ मते पडली. ताथवडा गावात राष्ट्रवादीला ४७३ मते, तर काँगे्रसला १५१ मते, तर शिवसेनेला ४५ मते पडली. झडकबाईचीवाडी गावात राष्ट्रवादीला १२९ मते, काँग्रेसला ११२ मते पडली. मिरेवाडीत राष्ट्रवादीला २४६ मते, तर काँग्रेसला १५६ मते पडली.विंचुर्णी गावात राष्ट्रवादीला २०१ मते, तर काँग्रेसला २३६ मते पडली. निरगुडीत राष्ट्रवादीला ६३७ मते, तर काँग्रेसला १०२८ मते पडली. मांडवखडकमध्ये राष्ट्रवादीला २०७ मते, काँग्रेसला ४०५ मते तर राष्ट्रवादीला २८४ मते पडली.
ढवळगावात राष्ट्रवादीला ६१७ मते, काँग्रेसला ६७० मते तर स्वाभिमानीला १९० मते पडली. पिराचीवाडी गावात राष्ट्रवादीला १५० मते, काँग्रेसला ७९ मते, शिवसेनेला २४ मते पडली. एकूण गिरवी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांना १०,३३० मते तर काँग्रेसचे दिगंबर आगवणे यांना १०,२१६ स्वाभिमानीचे पोपटराव काकडे यांना १,४१५ मते पडली. (वार्ताहर)

गटाची सत्ता काँगे्रसला फायद्याची
गिरवी जिल्हा परिषद गटाचे सदस्यत्व काँग्रेसकडे असून, एक पंचायत समिती गण काँग्रेसकडे तर एक गण राष्ट्रवादीकडे आहे. या गटात काँग्रेस विरोधी राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली. गिरवी, ता. फलटण हे माजी आमदार चिमणराव कदम यांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे निवडणुकीत गावामध्ये तणावाचे वातावरण होते. तरीही या गावातून दिगंबर आगवणे यांना आघाडी मिळाली.

Web Title: On the back of the 'hand' of the mortgages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.