शामगावमध्ये कोरोना चाचणीमुळे लसीकरणाकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:41+5:302021-06-24T04:26:41+5:30

कोरोना या संसर्गजन्य रोगाने सर्व जगात थैमान घातले आहे. यातून आपला देश व गावही चुकले नाही. यातून बाहेर पडण्यासाठी ...

Back to vaccination due to corona test in Shamgaon! | शामगावमध्ये कोरोना चाचणीमुळे लसीकरणाकडे पाठ!

शामगावमध्ये कोरोना चाचणीमुळे लसीकरणाकडे पाठ!

Next

कोरोना या संसर्गजन्य रोगाने सर्व जगात थैमान घातले आहे. यातून आपला देश व गावही चुकले नाही. यातून बाहेर पडण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. याचबरोबर काही संस्था व प्रत्येक कुटुंबाचे प्रयत्न आहेत. गेल्या वर्षांपासून या रोगावर औषध शोधण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. याला गेल्या काही महिन्यापूर्वी यश आले. शासनाकडून लसीकरण सुरू झाले. लोकांमध्ये थोडेफार गैरसमज असल्यामुळे या लसीकरणाकडे लोकांनी पाठ फिरवली होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट येताच लसीकरणासाठी लोकांची गर्दी झाली. लोकांना लस मिळणे कठीण झाले. प्रत्येक गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पन्नास-शंभर लस येत होती. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर लोकांचे वाद-विवाद होत होते. यामुळे शासनाला शेवटी लसीकरणाच्या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यावे लागले. तरीही लोकांना लस मिळत नव्हती; परंतु जिल्ह्यात बाधितांचा दर जास्त असल्यामुळे तपासण्या वाढविण्यात आल्या व लोकांची सक्तीने तपासणी करू लागले आता तर रेशनिंग बंदी तहसील कार्यालय तसेच मोकाट फिरणाऱ्यांची आदी पद्धतीने कोरोना तपासण्या केल्या जात आहेत.

Web Title: Back to vaccination due to corona test in Shamgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.