पारगावचे ढमाळ बनले ‘बजरंगी भाईजान’

By Admin | Published: September 17, 2015 12:40 AM2015-09-17T00:40:55+5:302015-09-17T00:44:16+5:30

हरियाणातील भाऊ बेपत्ता : असंख्य ठिकाणी फोनाफोनी केल्यानंतर भेटले नातेवाईक

'Bajrangi Bhaijaan' became a sham | पारगावचे ढमाळ बनले ‘बजरंगी भाईजान’

पारगावचे ढमाळ बनले ‘बजरंगी भाईजान’

googlenewsNext

मुराद पटेल / शिरवळ
स्मृतिभंश होऊन, नातेवाइकांपासून तब्बल साडेतीन वर्षे लांब राहिल्यानंतर एक देवदूत बनलेल्या अवलियामुळे हरियाणाच्या दोन सख्ख्या भावांची भेट झाली. ही अविस्मरणीय भेट घडवून आणली पारगावचे सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ यांनी.
हरियाणा राज्यातील औरंगाबाद (ता. जगाधरी जि. यमुनानगर) येथील चालक असलेला सोहम चरन सिंह ( वय ४५) हा स्मृतिभंश होऊन सुमारे साडेतीन वर्षांपासून घर सोडून फिरत फिरत खंबाटकी घाटात असणाऱ्या युवराज ढमाळ यांच्या हॉटेलसमोर येऊन उभा राहिला. यावेळी ढमाळ यांनी त्याला चहा-नाष्टा देऊन आस्थेने चौकशी केली असता त्याला फक्त स्वत:चे आणि वडिलांचे नाव व गावचे नाव सांगता येत होते. यावेळी युवराज ढमाळ यांनी मोबाइल इंटरनेटवर शोध घेत सोहमच्या शोध घेतला असता ते हरियाणा राज्यातील असल्याचे समोर आले. यानंतर एक तासाच्या अथक परिश्रमानंतर हरियाणा राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये खात्री करून कोणत्याही शासकीय मदतीविना एका हवालदाराकडून सोहमने सांगितलेल्या गावातील माजी सरपंचांचा मोबाइल नंबर मिळवून संपर्क साधला. सोहम यांचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला असता, तो त्या गावातीलच असून साडेतीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समजले.
मग सोहमला विश्वासात घेत युवराज यांनी आपल्या घरी आणले. त्याला नवीन कपडे देऊन स्वत:च्या घरातील कुटुंबातील एक सदस्य समजून सोहम सिंहची देखभाल केली. कारण सोहमच्या नातेवाइकांच्याकडे महाराष्ट्रात येण्यासाठी पैशांची कमतरता होती .
यावेळी युवराज ढमाळ यांनी ‘तुम्ही येईपर्यंत मी त्यांचा सांंभाळ करतो,’ असे सांगितल्याने नातेवाईक निश्चिंत झाले. दरम्यान, सोहम सिंहचा सख्खा भाऊ जय सिंह व चुलतभाऊ रिंकू सिंह आल्यानंतर खात्री करीत सख्ख्या भावाच्या ताब्यात ढमाळ यांनी सोहमला दिले. यावेळी तब्बल साडेतीन वर्षांनंतर भावाची भेट झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येत होता.

Web Title: 'Bajrangi Bhaijaan' became a sham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.