कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याचा सायकल प्रवास, आतापर्यंत केला २५ जिल्हे तीन हजार ४०० किलोमीटरचा प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 04:54 PM2021-12-23T16:54:52+5:302021-12-23T16:56:22+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव चे शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी अहमदनगर पासून मुंबई पर्यंत सायकल प्रवास सुरू केला आहे.

Balasaheb Kolse a farmer from Adgaon in Pathardi taluka of Ahmednagar district started cycling from Ahmednagar to Mumbai for debt relief | कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याचा सायकल प्रवास, आतापर्यंत केला २५ जिल्हे तीन हजार ४०० किलोमीटरचा प्रवास 

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याचा सायकल प्रवास, आतापर्यंत केला २५ जिल्हे तीन हजार ४०० किलोमीटरचा प्रवास 

googlenewsNext

सातारा : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी, एकरी लागणारी ऊस उत्पादन खर्च पकडून शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यात यावी, या मागणीसह इतर मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव चे शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी अहमदनगर पासून मुंबई पर्यंत सायकल प्रवास सुरू केला आहे.

कोळसे यांनी १३ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली आतापर्यंत त्यांनी २५ जिल्हे व तीन हजार ४०० किलोमीटर प्रवास पूर्ण केला आहे या प्रवासाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना भेटून करणार आहेत.

बाळासाहेब कोळसे म्हणतात सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली असून शेतकऱ्यांची दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी गटातटाचे राजकारण सोडून सर्वच पक्षांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे. सर्व आमदार-खासदारांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपसातील मतभेद विसरावेत.

शेतकरी शेतात काबाडकष्ट करतात मोठ्या मेहनतीने उभी करतात त्यात अतिवृष्टी दुष्काळ पिकांवरील रोगराई त्यांचा सामना करून पीक अंतर त्यानंतर पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून येथे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे तरी यासाठी योग्य त्या उपाययोजना करून शेतकऱ्यांना वाचवणे गरजेचे आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शेतकर्यांच्या लाजिरवाणी अवस्था म्हणजे अशोभनीय आहे.

कोळसे यांनी केलेल्या मागण्या..

- शेतकऱ्यांना कमी पडल्यावर मालाची किंमत ठरवता यावी
- सरकारकडून देण्यात येणारी मदत उत्पादनखर्च पकडून देण्यात यावी
- शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पकडून हमीभाव द्यावा
- सर्व शेतकर्यांना कर्ज मुक्त करण्यात यावे
- नोकर भरतीमधील भ्रष्टाचार करण्यात यावा
- शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावे
- शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या
- कर्जबाजारी तणावग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्या पासून वाचण्यासाठी शासनाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात यावी
- विज पंपासाठी मोफत वीज देण्यात यावी
 

Web Title: Balasaheb Kolse a farmer from Adgaon in Pathardi taluka of Ahmednagar district started cycling from Ahmednagar to Mumbai for debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.