साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझमा, लेसर बीम लाईटला प्रतिबंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 01:35 PM2024-09-14T13:35:48+5:302024-09-14T13:36:24+5:30

सातारा : प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास ...

Ban on plasma, laser beam light in Ganesha Visarjan procession in Satara, district collector's order | साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझमा, लेसर बीम लाईटला प्रतिबंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझमा, लेसर बीम लाईटला प्रतिबंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा : प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेले लहान मुले, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांचे डोळ्यास इजा होऊन त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीत मिरवणुकी दरम्यान प्लाझामा, बीम लाईट आणि लेसर बीम लाईटच्या वापर करण्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंध आदेश जारी केले आहे.

आदेशानुसार १२ ते १८ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीत अथवा कार्यक्रमात, कोणत्याही व्यक्ती किंवा गणेश मंडळ किंवा कार्यक्रम आयोजक यांनी प्लाझमा, बीम लाईट आणि लेसर बीम लाईट वापरात आणू नयेत, असे आदेश जारी केले आहेत.

Web Title: Ban on plasma, laser beam light in Ganesha Visarjan procession in Satara, district collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.