सातारा जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:07 AM2020-05-06T10:07:20+5:302020-05-06T10:08:49+5:30

सातारा जिल्हा रेड झोन मध्ये आहे. या ठिकाणी मद्यविक्री सुरु करता आली असती; परंतु बंदी कायम ठेवली गेली त्यामुळे सातारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली नाही.

Ban on sale of liquor maintained in Satara district | सातारा जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी कायम

सातारा जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी कायम

googlenewsNext

सातारा : संपूर्ण राज्यात मद्यविक्रीला सुरुवात झाली असली साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मात्र मद्य विक्रीला बंदी घातलेली आहे.

राज्य शासनाने लॉकडाऊनच्या काळातही ग्रीन झोन, आॅरेंज झोन तसेच रेड झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. हे आदेश निघताच संपूर्ण राज्यातील विविध शहरांमध्ये मद्य खरेदीसाठी मोठ्या रांगा लागल्या. कोरोनाशी लढा देत असताना सोशल डिस्टंसिंग महत्त्वाची आहे; मद्य खरेदीसाठी लोकांनी रांगा लावल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला.

अनेक ठिकाणी पोलीस बळाचा वापर करुन लोकांवर आवर घालावा लागला. ही परिस्थिती साताºयात मात्र उदभवली नाही. कारण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कठोरपणे आपल्या अधिकाराचा वापर करुन मद्यविक्रीला परवानगी दिली नाही. सातारा जिल्हा रेड झोन मध्ये आहे. या ठिकाणी मद्यविक्री सुरु करता आली असती; परंतु बंदी कायम ठेवली गेली त्यामुळे सातारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली नाही.

Web Title: Ban on sale of liquor maintained in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.