सदरबझारमधील ‘बंड्या’ बनलाय स्वच्छतादूत! अविरत सेवा : प्रामाणिकपणाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:34 PM2019-02-08T23:34:55+5:302019-02-08T23:36:32+5:30

उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांनी हाक दिली की तो हाती खोरं अन् पाटी घेऊन लगेचच कामाला धावतो. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते.

'Bandya' created in Sadarbazar, cleanman! Non-stop service: Honest citizens appreciate it | सदरबझारमधील ‘बंड्या’ बनलाय स्वच्छतादूत! अविरत सेवा : प्रामाणिकपणाचे कौतुक

स्वच्छतादूत अशी ओळख असलेला बंड्या स्वच्छतेची कामे प्रामाणिकपणे मार्गी लावत आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देकामाचे अनेकांना कुतूहल

सातारा : उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांनी हाक दिली की तो हाती खोरं अन् पाटी घेऊन लगेचच कामाला धावतो. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्वं पटवून देणाऱ्या या ‘बंड्या’च्या प्रामाणिकपणाचे नागरिक भरभरून कौतुक करतात. आता तर त्याला ‘स्वच्छतादूत’ म्हणूनच ओळखले जात आहे.

सदरबझारमध्ये पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांबरोबर ठेका पद्धतीने काम करणारा हा बंड्या स्वभावाने भोळा-भाबडा आहे. समोर आलेलं काम प्रामाणिकपणे मार्गी लावण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. अनेकदा काही कर्मचाºयांकडून काम करण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र, बंड्या याला अपवाद ठरत आहे.
गेल्या सात वर्षांपासून बंड्या ठेका पद्धतीने पालिकेत स्वच्छता विभागात काम करत आहे. त्याच्या घरीदेखील कोणीच नसल्याने त्याला पालिकेत काम मिळवूनदेण्यासाठी काही नागरिकांनी प्रयत्न केला होता. मध्यंतरी त्याला ठेक्यावरून कमी करण्यात आले होते. त्यावेळी येथील स्वच्छतेवर परिणाम जाणवू लागल्याने एका अधिकाºयाने पुन्हा त्याला ठेका पद्धतीने कामावर घेतले.

स्वच्छतागृह, गटार, मरून पडलेली जनावरे, डुक्कर उचलण्याची कामे करण्यासाठी बºयाचदा आरोग्य विभागाचे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. हे कामही शक्यतो बंड्याच मार्गी लागवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. स्वच्छतेचा दूत बनलेला बंड्या आजही गटारातील घाण डोक्यावरून वाहून नेत असतो. त्याच्याकडे आरोग्याच्या दृष्टीने कोणतेच सुरक्षेचे साहित्य नाही. तरी देखील सांगेल ती तो कामे करतो. त्यामुळे ‘बंड्या’तील स्वच्छतादूताचे सर्वांनाच कुतूहल वाटते.


जबाबदारीने कामे पूर्ण
अनेक वेळा कुत्री, डुकरे मरून पडलेली असतात. दुर्गंधीमुळे नागरिक नगरसेवकांनी वारंवार फोन लावून जनावरे उचलण्याची मागणी करत असतात. मात्र, आरोग्य कर्मचारी इतरत्र कामावर आहे, असे सांगितले जाते. त्यावेळी बंड्यालाच हे मृत जनावरे उचलण्याची जबाबदारी दिली जाते.

 

आमच्या परिसरात अनेकदा बंड्याच स्वच्छता करण्यासाठी येत असतो. त्याला सांगितलेली स्वच्छता तो लगेच करतो. त्यामुळे आमचा परिसर स्वच्छ राहत आहे.
- निलोफर शेख, गृहिणी


 

Web Title: 'Bandya' created in Sadarbazar, cleanman! Non-stop service: Honest citizens appreciate it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.