कोरेगावात बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:46 PM2019-05-05T23:46:40+5:302019-05-05T23:46:44+5:30
पुसेगाव : कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्याच बँकेतील कर्मचाºयाने राहत्या ...
पुसेगाव : कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्याच बँकेतील कर्मचाºयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी शाखाधिकारी महेश पाटील याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
पंकज शिवाजी गायकवाड (वय २७, रा. शिंदेवाडी, ता. खटाव) असे आत्महत्या केलेल्या बँक कर्मचाºयाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आणि मृत युवकाचे वडील शिवाजी श्रीरंग गायकवाड (रा. शिंदेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पंकज हा वडूज येथील आयसीआयसीआय या बँकेत दोन वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर काम करत होता. त्यानंतर त्याने या बँकेची परीक्षा देऊन त्याच बँकेत रिलेशनशिप आॅफिसर म्हणून पद मिळविले. एक वर्ष पुणे येथील बँकेच्या शाखेत काम केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पंकज कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत काम करू लागला. वडील शिवाजी गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर शाखाधिकारी महेश पाटीलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.
कामावरून काढून टाकण्याची धमकी
वर्षभरापासून बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील हे पंकजच्या मोबाईलवर सातत्याने कामावरून काढून टाकेन, अशी विनाकारण धमकी देत होते. ‘तुझे काम बरोबर नाही, तुला कामावरून काढून टाकणार आहे, तू त्याच लायकीचा आहेस, तुझा प्रवासभत्ता बिल मंजूर करणार नाही, काय करायचे ते कर,’ अशी वारंवार धमकी देत होते. याबाबत पंकज याच्या मोबाईलवर या दोघांतील संभाषण रेकॉर्डिंग झालेले आहे. त्याने दिवसभर इतरत्र फिरून आणलेली कामे संबंधित शाखाधिकारी दुसºया व्यक्तीच्या नावे सातत्याने टाकत होते. ‘तुझ्यामुळे बँकेचा परफॉर्मन्स खाली आला आहे. कामावरून तरी काढून टाकतो, नाही तर तुझी बदलीच करतो,’ अशी धमकी त्याच्या व्हॉट्सअॅपवर त्यांच्याकडून दिली जात होती. घरची जबाबदारी अंगावर असल्याने जर कामावरून काढून टाकले तर काय होईल, या विचाराने पंकज गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रचंड दबावाखाली व मानसिक दडपणाखाली होता. या त्रासाला कंटाळून त्याने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.