खरीप हंगामासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करावे : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:59+5:302021-05-25T04:43:59+5:30
सातारा : या अडचणीच्या काळात खरीप हंगामात बँकांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वाटप करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा ...
सातारा : या अडचणीच्या काळात खरीप हंगामात बँकांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वाटप करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम बॅंकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
येथील नियोजन भवनात खरीप हंगाम २०२१ पीक कर्ज पुरवठा, शेती विद्युत पंप व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतची आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
खरीप हंगाम २०२१ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची मागणी केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या कर्जाची प्रकरणे मंजूर करावीत, अशा सूचना करुन, तौक्ते वादळामुळे विद्युत वितरण कंपनीचे वीज खांब पडले आहेत, ते तत्काळ दुरुस्त करुन गावांमधील खंडित झालेला विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला मार्गदर्शन केले.