अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रासाठी बँका सुरु राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:18+5:302021-06-02T04:29:18+5:30

सातारा : सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका व सहकारी बँका सकाळी ११ ते दुपारी २ या ...

Banks will continue to operate in the essential services sector | अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रासाठी बँका सुरु राहतील

अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रासाठी बँका सुरु राहतील

Next

सातारा : सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका व सहकारी बँका सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेमध्ये अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रासाठी सुरू राहतील. शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्जाचे, खते, बी-बियाणे, शेती औजारे यांची दुकाने, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप, मेडिकल यांचे रोख व्यवहार इ. कामकाज, एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटर ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत चालू राहील. तसेच या बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील. या ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कारोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी काढले आहेत.

Web Title: Banks will continue to operate in the essential services sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.