तांबवेत ‘बॅनर वॉर’ला बगल !

By admin | Published: October 25, 2015 12:21 AM2015-10-25T00:21:24+5:302015-10-25T00:21:24+5:30

फलकविरहित निवडणूक : वादावादीच्या घटनांना बसणार आळा

'Banner War' in Tambhat next! | तांबवेत ‘बॅनर वॉर’ला बगल !

तांबवेत ‘बॅनर वॉर’ला बगल !

Next

दीपक पवार ल्ल तांबवे
राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या तांबवे गावच्या ग्रामपंचायत निवडणकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येथे १३ जागांसाठी ३१ उमेदवार रिंंगणात आहेत. वॉर्ड क्रमांक १ व ५ मध्ये तिरंगी लढत व वॉर्ड क्रमांक २, ३ व ४ मध्ये दुरंगी लढत होत आहे. यामध्ये तिन्ही पॅनेलच्या प्रमुखांनी यावेळची निवडणूक बॅनरविरहित करण्याचा निर्णय घेतला आहे. गावात प्रचाराचा कसलाही बॅनर लावला जाणार नसल्याने वादावादीचे प्रसंग टळणार आहेत.
तांबवेतील ग्रामपंचायत निवडणूकही नेहमी वादाची व संघर्षाची होते. गाव पाटण विधानसभा मतदार संघाला जोडलेले असल्यामुळे येथे ‘सतरा कारभारी’ असल्याचे नेहमी पहावयास मिळते. यावेळीही गावात निवडणूकीचा चांगलाच फड रंगला आहे. तिन पॅनेलच निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. येथे एकूण चार हजार मतदार तर ५ वॉर्ड आहेत. यावेळी सरपंचपद इतर मागास प्रवर्ग पुरूषासाठी आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील, अविनाश पवार, माजी सरपंच प्रदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल, निवासराव पाटील, आनंदा ताटे, प्रकाश चव्हाण यांचे भैरवनाथ तर सह्याद्री कारखाना संचालक पी. डी. पाटील, अशोक पाटील, सतीश पाटील, रामचंद्र पवार व प्रकाश पवार यांचे तांबजाई पॅनेल निवडणुक रिंगणात आहे. या पॅनेलमधून अनेक उमेदवार नशिब आजमावत आहेत.
 

निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
तिन्ही पॅनेलच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तांबवे गावची ग्रामपंचायत निवडणूक विनाफलक पार पडणार आहे. फलक लावण्यावरून येथे यापुर्वी वादावादीचे प्रकार घडले आहेत. तांबवे गावची ग्रामपंचायत सन २०१५-१६ मध्ये अमृत महोत्सवात पदार्पण करीत आहे. यातच निवडणूक लागली आहे. तांबवे गाव पाटण मतदार संघाला जोडल्यामुळे येथे आमदार शंभूराज देसाई, विक्रमसिंह पाटणकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे गट आहेत.

Web Title: 'Banner War' in Tambhat next!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.