बारामतीचं प्रेम आता वाठारमार्गे रेठºयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:20 PM2017-10-04T23:20:28+5:302017-10-04T23:20:28+5:30

Baramati's love is now in the middle of the Vathaara! | बारामतीचं प्रेम आता वाठारमार्गे रेठºयात !

बारामतीचं प्रेम आता वाठारमार्गे रेठºयात !

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : बारामतीकरांची ‘मती’ कधी कोणावर फिरेल, हे जसं सांगता येणं अवघड तसंच त्यांच प्रेमही कधी कोणावर बसेल, हे देखील सांगता येत नाही. कºहाड दक्षिणचच बोलायचचं म्हटलं बारामतीकरांच प्रेम वाठारमार्गे पुढे रेठºयाकडे कधी सरकलं, हे कोणालाच कळलं नाही. बुधवारी उत्तरेतील सभा उरकून दक्षिणेतील रेठºयात शरद पवारांनी कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांची घेतलेली भेट ही त्यामुळेच चर्चेचा विषय बनली आहे.
खरं तर कºहाड दक्षिणमधील बारामतीकरांचे निष्ठावंत पाईक म्हणून नेहमी वाठारकरांकडे पाहिले जायचे. विलासराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राजेश पाटील हे देखील पवारांचाच ‘राग’ आळविताना दिसतात. पण दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रेठरेकरांकडे थोरल्या पवारांचे प्रेम जास्तच सरकल्याची चर्चा आहे.
शरद पवारांच्या आजच्या भेटीने तर या चर्चांना दुजोराच मिळतोय.
२०१५ च्या सुमारास कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. वाठारच्या माळावर थोरल्या पवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यावेळी थोरल्या पवारांनी अविनाश दादांच्या घरी प्रीतिभोजन घेतले होते. त्यानंतर बुधवारीही उत्तरेत सह्याद्री कारखान्यावर साखर कामगारांच्या राज्य मेळाव्याला हजेरी लावून त्यांनी थेट रेठरे गाठले.
पवारांच्या ऐनवेळच्या या दौºयामुळे राजकीय उलट-सुलट चर्चांना ऊत तर येणारच !सहकारातील ‘भीष्माचार्या’ची भेट महत्त्वपूर्ण !
कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारांचा आरोप माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंसह त्यांच्या संचालक मंडळावर करण्यात येत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ होऊन काहिंना तुरुंगाची हवाही खावी लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सहकारातील ‘भिष्माचार्य’ असणाºया थोरल्या पवारांनी अविनाश मोहितेंची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. कºहाडमधील शरद पवार यांचा दौरा निश्चित असला तरी अविनाश मोहिते यांची भेट निश्चित नव्हती. अचानक पवार यांनी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.
आधी ‘डॉक्टर’ आता ‘इंजिनिअर’
थोरल्या पवारांचं प्रेम तसं रेठरेच्या मोहितेंवर पहिल्यापासूनच होतं. फक्त यापूर्वी ते डॉक्टरांवर होतं. आता ते इंजिनिअर मोहितेंच्यावर जडलं आहे एवढचं. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांचे सुपुत्र डॉ. इंद्रजित मोहितेंना साखर उद्योगाशी संबंधित अनेक संस्थांवर काम करण्याची संधी थोरल्या पवारांनी दिली. मात्र, डॉक्टरांनी राष्ट्रवादीत जाणे कटाक्षाने टाळले. याउलट आबासाहेब मोहिते यांचे वारसदार असणाºया इंजिनिअर अविनाश मोहिते यांनी दोन वर्षांपूर्वी थोरल्या पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधल्याने थोरल्या पवारांचे प्रेम त्यांच्यावर बसणे स्वाभाविकच आहे.
उंडाळकरांना प्रेम कधी मिळणार?
एकेकाळी जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते म्हणून ओळखल्या जाणाºया माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांना त्यांच्या पुतण्याने सोडचिठ्ठी देत धाकट्या पवारांच्या उपस्थितीत उंडाळ्यात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे दक्षिणेतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यात ‘आनंद’ पसरला. पण काय करणार ‘राव’ दीड वर्ष होऊन अजून उंडाळ्याच्या या वकील नेत्यांवर बारामतीकरांची कृपा झालेली दिसत नाही.
मोळी टाकतानाच बांधली मोळी !
थाकट्या पवारांनीही अविनाश मोहिते कारखान्याचे अध्यक्ष असताना कारखान्याची मोळी टाकण्याच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याच कार्यक्रमात अविनाशदादांना राष्ट्रवादीत घेऊन दक्षिणेत मोळी बांधण्याचा कदाचित त्यांनी संकल्प केला असावा. हा संकल्प पूर्णत्वाला गेल्याचे पाहायला मिळाले.
वस्तूस्थिती जाणली
रेठरे येथे अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी पाऊण तासाची सदिच्छा भेट देऊन मी अविनाश मोहितेंच्या पाठिशी आहे. असाच संदेश थोरल्या पवारांनी अप्रत्यक्ष दिल्याचे अनेक राजकीय जाणकार सांगतात. रेठºयात नाष्टा करता करता पवारांनी अविनाश मोहितेंकडून याबाबतची वस्तूस्थिती जाणून घेतली.

Web Title: Baramati's love is now in the middle of the Vathaara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.