केवळ घोषणांचा आधार; निराधारांना एक हजाराची मदत कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:40 AM2021-05-13T04:40:18+5:302021-05-13T04:40:18+5:30

बँक खाते रिकामे; एकोणसाठ हजार निराधारांना लागलेत वेध लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यामधील ...

Base of declarations only; When will the destitute get a thousand help? | केवळ घोषणांचा आधार; निराधारांना एक हजाराची मदत कधी मिळणार

केवळ घोषणांचा आधार; निराधारांना एक हजाराची मदत कधी मिळणार

Next

बँक खाते रिकामे; एकोणसाठ हजार निराधारांना लागलेत वेध

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यामधील ५९,३४२ लाभार्थींना मुदतीआधी ही मदत दिली जाणार होती मात्र ही मदत मिळाली नसल्याने निराधारांना मदत कधी मिळणार याबाबत चर्चा झडू लागली आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना या पाच योजनेच्या लाभार्थींना राज्य शासनाने प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यात ५९ हजार ३४२ लाभार्थींना ही मदत दिली जाणार आहे. लॉकडाऊन महिनाभरापूर्वी केले; परंतु अजूनही या निराधारांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) पॉइंटर्स

योजना लाभार्थी

संजय गांधी निराधार योजना - ३१,६२२

श्रावणबाळ योजना - १८,८५१

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना - ७४९६

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना - १२६७

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना- १०६

कोट १

शासनाने श्रावण बाळ योजनेतून आर्थिक लाभ दिल्याने आम्ही जगू शकतो. बँक खात्यावर अजूनही पैसे जमा झाले नसल्याने गरजेच्या वस्तू खरेदी करता येत नाही.

- महादेव जाधव, लाभार्थी श्रावण बाळ योजना

कोट २

वृद्धापकाळमध्ये काम होत नाही. उपासमारीची वेळ आली तेव्हा कोणीतरी सांगितलं शासन वृद्धांना निवृत्तिवेतन देतं. या योजनेचा फॉर्म भरला; पण अजून एकही आत्ता आलेला नाही.

- श्रीरंग नलावडे, लाभार्थी इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना

कोट ३

शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरला. शासनाने हा फॉर्म मंजूर केल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून आर्थिक लाभ घेत आहोत. गेल्या दोन महिन्यापासून मदतीची प्रतीक्षा आहे.

- संभाजी पवार, लाभार्थी संजय गांधी निराधार योजना

कोट ४

घरात कोणी करतं माणूस नाही. मोलमजुरी करूनच कुटुंब चालवत आहे. आता कामही मिळत नाही. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- प्रमिला कुंभार, लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना

कोट ५

इंदिरा गांधी निवृत्तिवेतनामुळे मी कुटुंबाचा आधार बनलो आहे. ही मदत वेळेत मिळाली तर कुटुंबाला हातभार लागतो. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी.

- सजन कदम, लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना

कोट

विविध निराधार योजनेच्या लाभार्थींना शासनाने मदत जाहीर केली आहे. त्याचे पैसे तालुक्यांना पाठवलेले आहेत. तहसील कार्यालयामार्फत या पैशांचे वाटप होत असते.

- रामचंद्र शिंदे

अतिरिक्त जिल्हाधिकारी

पॉइंटर्स

कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो हे लक्षात घेऊन घरात बसून आहेत. इतर खर्च होत नसला तरी उपजीविकेसाठी लागणारा पैसा जवळ पाहिजे.

लॉकडाऊनमुळे कामेदेखील थांबलेले आहेत. पैसा येण्याचे मार्ग बंद झाले आहेत. अशावेळी शासनाची मदत मिळणे अत्यावश्यक आहे.

Web Title: Base of declarations only; When will the destitute get a thousand help?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.