काठचे वाटप करुन ज्येष्ठांना दिला मायेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 07:30 PM2017-10-06T19:30:43+5:302017-10-06T19:30:43+5:30
ज्यांनी वयाची साठ वर्षे ओलांडली आहे व ज्यांना चालताना काठीचा आधार गरजेचा आहे, अशा सर्व वयोवृद्ध महिला व पुरुषांना ग्रामपंचायत व ज्येष्ठ नागरिक संघ पाचवड यांच्या वतीने काठीचे वाटप करून मायेचा आधार देण्यात आला.
पाचवड, दि.६ : पाचवड ग्रामपंचायत व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांना काठीचे वाटप करण्यात आले.
ज्यांनी वयाची साठ वर्षे ओलांडली आहे व ज्यांना चालताना काठीचा आधार गरजेचा आहे, अशा सर्व वयोवृद्ध महिला व पुरुषांना ग्रामपंचायत व ज्येष्ठ नागरिक संघ पाचवड यांच्या वतीने काठीचे वाटप करून मायेचा आधार देण्यात आला.
कार्यक्रमास सातारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष संपतराव भोसले, ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे सचिव अण्णा पवार हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष संपतराव भोसले म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणाºया शेतकºयांना यापुढे दरमहा कमीत-कमी तीन ते चार हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येणार असून, येत्या दीड ते दोन वर्षांमध्ये हे काम तडीस लावणार आहे. यावेळी डॉ. सागर गायकवाड यांनी आहार व आरोग्य यासंबंधी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंतराव जाधव यांनी प्रस्ताविक केले. अमृतवाडीगावचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पार्टे यांनी आम्ही म्हातारे ही भावनात्मक कविता वाचून अनेकांची मने जिंकली.
कार्यक्रमास सरपंच भरत गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष भिकूराव शेवाळे, सचिव कृष्णराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदा गायकवाड, पंचायत समिती सदस्या संगीता चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड, विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी गायकवाड, उपसरपंच अस्मिता शेवाळे, माजी सरपंच महेश गायकवाड, नवलाई पतसंस्थेचे संचालक अशोकराव गायकवाड, अनिल शेवाळे, अप्पा मोहिते, शरद जाधव, ग्रामस्थ व सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रवीण गायकवाड सूत्रसंचालन केले तर विठ्ठल गायकवाड यांनी आभार मानले.