Satara: चक्क खड्ड्यातील पाण्याने केली आंघोळ, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त

By प्रगती पाटील | Published: October 14, 2024 02:28 PM2024-10-14T14:28:55+5:302024-10-14T14:29:13+5:30

सातारा : पालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या त्रिशंकु शाहूनगर भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची व्यथा ...

Bathed with water from a pit in Satara, Bad condition of the road | Satara: चक्क खड्ड्यातील पाण्याने केली आंघोळ, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त

Satara: चक्क खड्ड्यातील पाण्याने केली आंघोळ, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त

सातारा : पालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या त्रिशंकु शाहूनगर भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची व्यथा मांडण्याबरोबरच पालिका प्रशासनाचे या रस्त्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शाहूनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सनी भिसे यांनी चक्क खड्ड्यातील पाण्याने सकाळी रस्त्यावर अभ्यंगस्नान केले.

शाहूनगर येथील एसटी काॅलनी ते अजिंक्य बझार चाैक रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन गुरूकृपा काॅलनी समोरील रस्त्यावर करण्यात आले. या रस्त्यावर सांडपाणी तसेच पावसाचे पाणी व प्रचंड खड्डे यामुळे अनेक अपघात होत आहेत. शाहूनगरातील नागरिकांना होणारा त्रास अधोरेखित करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

त्यांच्या या आंदोलनामुळे पालिका प्रशासन जागृत होऊन रस्त्याचा प्रश्न निकाली काढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड, मालोजी माने, संतोष घुले, प्रकाश घुले, प्रसन्न अवसरे, तुषार साठे, संतोष घोरपडे, सुरज चव्हाण, प्रदीप जाधव, भैय्या लांडगे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Web Title: Bathed with water from a pit in Satara, Bad condition of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.