लग्नाच्या वाढदिवशी तिनं आईवडिलांसाठी बांधलं स्वच्छतागृह

By admin | Published: June 2, 2017 08:03 PM2017-06-02T20:03:05+5:302017-06-02T20:03:05+5:30

आईवडिलांसाठी स्वच्छतागृह बांधून सात-यातील तेजस्वी मोरेनं समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

The bathroom built for the parents on the wedding day | लग्नाच्या वाढदिवशी तिनं आईवडिलांसाठी बांधलं स्वच्छतागृह

लग्नाच्या वाढदिवशी तिनं आईवडिलांसाठी बांधलं स्वच्छतागृह

Next
>ऑनलाईन लोकमत 
कवठे (सातारा), दि. 2 - गावक-यांनी निर्मल ग्रामचा ध्यास घेतलेला. त्यामुळे घरात स्वच्छतागृह बांधण्याचा आग्रह धरला जात होता. पण, वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ते असमर्थ होते. माहेरी आलेल्या तेजस्वीला हे पाहावले नाही. आई-वडिलांसाठी स्वच्छतागृह बांधून स्वत:च्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाची भेट दिली.
 
वाई तालुक्यातील कवठे येथील शिवाजी सूर्यवंशी यांची कन्या तेजस्वी हिचा विवाह पाच वर्षापूर्वी अतीत येथील विजय मोरे यांच्याशी झाला. विजय मोरे हे मुंबई येथे नोकरीस असल्याने स्वत:च्या मालकीच्या घरात मुंबई येथे तेजस्वीचा संसार सुरू झाला. 
 
वडील कवठे येथे रंगकाम करून कुटुंब चालवत असल्याने परिस्थिती तशी जेमतेमच. पदरी दोन मुली व एक मुलगा त्यातच मुलीच्या लग्नाचे कर्ज डोक्यावर असल्याने  घराच्या बांधकामाची इच्छा असून पैशापुढे इलाज चालत नव्हता. 
 
सध्या उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून माहेरी महिन्याभरासाठी तेजस्वी आली. कवठे गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने वडिलांना बोलावून घेऊन स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यास सांगितले. वडिलांनी दुष्काळी परिस्थितीने शेतीचे काहीच उत्पन्न नसल्याने व रंगकामात मंदी असल्याने शौचालय बांधण्यास असमर्थता दर्शविली. 
 
पावसाळाजवळ आल्याने ओढ्यालगत असलेल्या घरात पावसाचे पाणी दरवर्षीच शिरायचे. त्याचा त्रास, शौचालय नाही त्यामुळे कुटुंबाला होणारा त्रास तेजस्वीच्या समोर घडत असल्याने तेजस्वी विचार करू लागली आणि कोणतेही जुजबी प्रशिक्षण नसतानाही तिने स्वत:च बांधकाम करावयाचा निर्धार केला. 
 
ही कल्पना आई सुमन व भाऊ अक्षयच्या कानावर घालून शौचालय बांधणीसाठीचे साहित्याची जुळवाजुळव करण्यास कुटुंबात सांगितले. स्वत: पुढाकार घेऊन आपल्या लग्नाच्या वाढदिवशी शौचालय, तसेच घरास संरक्षक भिंत बांधून आई वडिलांच्या प्रपंचाला मदत तिने केलीच आणि नावाप्रमाणे तेजस्वी काम करून शौचालय बांधून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
 
समाधान मिळालं - तेजस्वी मोरे
शौचालय बांधण्यासाठी अत्यावश्यक साहित्य विकत आणले पण खिडकीच्या जागी विटांच्यामध्ये आडवे गज लावून खिडकी तयार केली. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी जुजबी ज्ञानावर स्वत: बांधकाम केले आणि त्याचे मला निश्चितच समाधान आहे. यामध्ये माझे पती आणि माहेरच्या नातेवाईकांनी मला साथ दिली.

Web Title: The bathroom built for the parents on the wedding day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.