बीडीओ म्हणतात, ‘मी घरगडी नाय!’ ऐकावं ते नवल; दुष्काळी गावाच्या सर्व्हेसाठी ‘भूजल’ला मिळेना वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:35 PM2018-08-10T23:35:27+5:302018-08-10T23:35:34+5:30

माण तालुक्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत असताना पंचायत समितीचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील कलगीतुरा रंगला आहे.

 BDO says, 'I am not a stranger!' 'Groundwater' vehicle for drought-hit survey of villages | बीडीओ म्हणतात, ‘मी घरगडी नाय!’ ऐकावं ते नवल; दुष्काळी गावाच्या सर्व्हेसाठी ‘भूजल’ला मिळेना वाहन

बीडीओ म्हणतात, ‘मी घरगडी नाय!’ ऐकावं ते नवल; दुष्काळी गावाच्या सर्व्हेसाठी ‘भूजल’ला मिळेना वाहन

Next

सातारा : माण तालुक्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत असताना पंचायत समितीचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील कलगीतुरा रंगला आहे. तालुक्यातील प्रश्नाबाबत सभापतींनी फोन केला म्हणून गटविकास अधिकारीच त्यांच्यावर भडकले. ‘मी तुमचा घरगडी नाय, माझ्या मोबाईलवर फोन करायचा नाही,’ असं अजब उत्तर त्यांच्याकडून मिळाल्यानं नाराज झालेले सभापती रमेश पाटोळे यांनी जिल्हा परिषदेच्या भर सभेत आपली विवंचना जाहीरपणे मांडली.

सामान्य माणसांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या समस्या सोडविणे, ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र, प्रशासनाची अडेलतट्टू भूमिका राहिली तर लोकप्रतिनिधींना आपली ताकद दाखवावीच लागते. पाटोळे यांनीही आपल्या अधिकाराचा वापर करत जिल्हा परिषदेच्या सभेतच झालेल्या अपमानाचे पाढे वाचले. त्यांना जिल्हा परिषदेचे सदस्य व इतर पंचायत समित्यांच्या सभापतींचाही पाठिंबा मिळाल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे बोलू नये, तसे झाल्यास गय केली जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

माणचे सभापती रमेश पाटोळे या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाले, ‘माण तालुक्यातील पाणवन, बिदाल, भालवडी या गावांसह २५ गावांत तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. या भागात दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. मात्र, गटविकास अधिकारी या प्रश्नाबाबत गांभीर्याने घेत नाहीत. दुष्काळाबाबतचा ठराव दोन महिन्यांपूर्वीच केला. तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयातील लालफितीच्या कारभारात तो लटकला. आम्ही पाठपुरावा करून तो पुढे सरकवला. तर पुढे भूजल सर्वेक्षण विभागात पुन्हा हा प्रस्ताव लटकला. भूजल सर्वेक्षण विभागात मी स्वत: जाऊन अधिकाºयांशी चर्चा केली तर अधिकारी म्हणतात, ‘आम्हाला गाडी नसल्यानं सर्व्हे होऊ शकत नाही.

माणवर दुष्काळाचे सावट
माण तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. २५ टक्के भागातच पाऊस झाला. मात्र अद्यापही ७५ टक्के भागावर दुष्काळाचे सावट आहे. याचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
 

माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी. डी. शेलार यांना तालुक्यातील दुष्काळी गावांच्या सर्व्हेबाबत फोन केला. तर त्यांनी माझ्याशी उद्धट भाषा वापरली. माझ्याशी भडकूनच ते बोलले. ते जे काही बोलले, त्याचा पुरावा माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड आहे.
- रमेश पाटोळे, सभापती, माण

Web Title:  BDO says, 'I am not a stranger!' 'Groundwater' vehicle for drought-hit survey of villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.