राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा!, उदयनराजेंचा राऊतांना टोला

By दीपक देशमुख | Published: March 4, 2023 07:15 PM2023-03-04T19:15:05+5:302023-03-04T19:15:40+5:30

ज्या घराण्याच्या जिवावर तुमचा पक्ष उभा आहे, त्यावर टीका करताना लाज तरी बाळगा

Be a little shy while talking about the royal family, MP Udayanraje Bhosle criticizes Sanjay Raut | राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा!, उदयनराजेंचा राऊतांना टोला

राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा!, उदयनराजेंचा राऊतांना टोला

googlenewsNext

सातारा : काहींचा स्वभावच विकृत असतो. परंतु, या विकृतीची जेव्हा वाढ होते, त्यावेळी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. तुमचा उरला-सुरला पक्ष वाढवण्यासाठी जरूर काम करावे. पण, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच तुमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांना लगावला.

सातारा येथील दौऱ्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले. खा. उदयनराजे भोसले म्हणाले, राऊत यांना महत्त्व देत नाही. अशा प्रवृत्ती व्यक्तिकेंद्रित आहेत. परंतु, त्यांनी मोजून-मापून वक्तव्य केले पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग व्हावा, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवरच आज भारत सर्वांत मोठी लोकशाही असणारा देश आहे. 

सर्वधर्मसमभावाची संकल्पना छत्रपती शिवरायांंनीच मांडली. याच छत्रपतींचे नाव घेऊन तुमचा पक्ष उभा आहे. राजकारण जरूर करा. तुमच्या उरल्या-सुरल्या पक्षाचे काम जरुर करा. पण, दुसऱ्यावर शिंतोडे उडवले म्हणजे तुम्ही फार मोठे होता असे नाही. लोकांना एकत्र ठेवणे महत्त्वाचे असते. तोडफोड करायला जास्त अक्कल लागत नाही. लोकशाही मानता, मग जाती-धर्मात का मतभेद आहेत? ज्यांच्यावर टीका केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून का बसता? विकृत लोक सत्तेत राहण्यासाठी काहीही गरळ ओकत असून, ही निर्लज्जपणाची हद्द असल्याची टीका खा. उदयनराजे भोसले यांनी केली.

राजघराण्याचा मानसन्मान भाजप ठेवत नसल्याचे पत्रकारांनी छेडले असता खा. उदयनराजे भोसले म्हणाले, तुम्ही किती आमचा अनादर करता, काही विषय नसेल तर राजघराण्याचे नाव घ्यायचे. ज्या घराण्याच्या जिवावर तुमचा पक्ष उभा आहे, त्यावर टीका करताना लाज तरी बाळगा, असे खा. भोसले म्हणाले.

Web Title: Be a little shy while talking about the royal family, MP Udayanraje Bhosle criticizes Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.