सावधान..! फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:23+5:302021-09-22T04:43:23+5:30

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून थंड असलेल्या ऑनलाईन मार्केटने उसळी घेतली असून, सणासुदीचा मुहूर्त साधून हे चोरटे सक्रिय झाले ...

Be careful ..! Fraud can happen under the guise of festival offers! | सावधान..! फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक!

सावधान..! फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक!

googlenewsNext

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून थंड असलेल्या ऑनलाईन मार्केटने उसळी घेतली असून, सणासुदीचा मुहूर्त साधून हे चोरटे सक्रिय झाले आहेत. फेस्टिव्हलच्या नावाखाली आपली फसवणूक होऊ शकते, याची खबरदारी घेऊनच आपले आवडते शाॅपिंग करा, असा सल्ला सायबर तज़्ज्ञ देत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे. हे ओळखून व्यावसायिकांकडून गिऱ्हाईकाला आकर्षित करण्यासाठी फेस्टिव्हल ऑफर्स दिल्या जातात. या ऑफर्संना भुलून अनेकजण खरेदी करतात. मात्र, जेव्हा खरेदी केलेली वस्तूच येत नाही; शिवाय आपल्या खात्यातील पैसेही आपोआप कट झालेले असतात, तेव्हा मात्र पायाखालची वाळू सरकते. त्यामुळे हे प्रकार होऊ नयेत म्हणून ऑनलाईन खरेदी करताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. शिवाय आपल्या बॅंक खात्याची माहिती समोरच्या व्यक्तीला देऊ नये. अन्यथा आपली फसवणूक झालीच म्हणून समजा.

चाैकट : अशी होऊ शकते फसवणूक

१) तुम्हाला एखाद्या वस्तूवर दुसरी वस्तू मोफत दिली जाईल, अशी ऑफर दिली जाते. पहिल्या वस्तूची किंमत नगण्य असल्यामुळे आपण ऑफर स्वीकारतो. इथेच आपली चूक ठरते. संबंधित व्यक्तीला आपण आपले बॅंक डिटेल्स देऊन बसतो. काही वेळानंतर आपल्या मोबाईलवर धडाधड पैसे कट झाल्याचा जेव्हा मेसेज येतो; तेव्हा मात्र आपल्याला पश्चातापाची वेळ येते.

२) एखाद्यावेळेस फसवणूक करणारे तुमचे बॅंक अकाऊंट मागणार नाहीत. मात्र, तुम्ही खरेदी केलेली वस्तू मात्र बोगस असू शकते. समजा तुम्ही ऑनलाईन लॅपटाॅप खरेदी केलाय, तर या लॅपटाॅपऐवजी तुम्हाला एखादा जुना रेडिओ किंवा लॅपटाॅपच्या आकाराचा आणि वजनाचा खाकी पुठ्ठाही येऊ शकतो. अशाप्रकारे यापूर्वी बऱ्याचजणांची फसवणूक झालीय.

चाैकट : ही घ्या काळजी...

१) ऑनलाईन ऑफर आल्यास आपण ती लिंक खरी आहे की खोटी हे पहिल्यांदा पाहिले पाहिजे किंवा कंपनीच्या वेबसाईटवरून तुम्ही खरेदी करणार आहात, ती वेबसाईट त्याच कंपनीची आहे का, हे पाहिले पाहिजे. काही वेबसाईट नावाजलेल्या कंपनीशी मिळतीजुळते नाव लिहून ग्राहकांची फसवणूक करतात. त्यामुळे प्रचंड सतर्कता हाच एकमेव फसवणुकीपासून दूर राहण्याचा उपाय आहे.

२) ऑनलाईन शाॅपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळांचा वापर करा

३) एखाद्या वस्तूवर ऑफर्स दिल्यानंतर त्या वस्तूची किंमत किती, आपल्याला ती वस्तू किती रुपयांना मिळणार, याची खात्री करावी. काहीवेळेस समोरची व्यक्ती तुमच्या मोबाईलवर फोन करून तुम्हाला बॅंक डिटेल्सची सर्व माहिती मागू शकते. अशावेळी तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली पाहिजे. तरच तुमची फसवणूक होणार नाही.

ऑनलाईन फसवणूक

जानेवारी- ९

फेब्रुवारी-१४

मार्च-७

एप्रिल-५

मे-११

जून-३

जुलै-४

ऑगस्ट-२

Web Title: Be careful ..! Fraud can happen under the guise of festival offers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.