सावधान! जावळीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:21+5:302021-04-15T04:38:21+5:30

कुडाळ : जावळी तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाबधितांचा आकडा वाढत असून तालुक्यात ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्याबरोबरच आता ...

Be careful! The number of corona sufferers in Jawali is increasing | सावधान! जावळीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

सावधान! जावळीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

Next

कुडाळ : जावळी तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाबधितांचा आकडा वाढत असून तालुक्यात ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्याबरोबरच आता तालुक्यातील बाजारपेठेची गावे आणि इतर भागातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.

गेल्या दोन - तीन दिवसात तालुक्यात कोरोनाबाधितांमध्ये अधिकच वाढ झालेली आहे. याकरिता पंचायत समिती, आरोग्य विभाग,महसूल व गृह विभाग यांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच गावोगावी लोकांच्यात जनजागृतीही केली जात आहे. नागरिकांनीही विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे. घरीच राहा, सुरक्षित राहा... हा कानमंत्र जपत आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरू असलेली कोरोनाची महामारी आता वर्ष होत आले तरी सुरूच आहे. हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच, पुन्हा नव्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असून यातच गेल्या दोन-तीन दिवसांत १६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एकूण ९ जणांचा कोरोनाने मृत्यूही झाला आहे. जावळी तालुक्यातील वाढणारी रुग्णसंख्या पाहता, उपचारासाठी तालुक्याची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच रायगाव येथील कोविड सेंटरमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करून त्वरित उपचार घेतले पाहिजेत. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये सध्या कोरोना लसीकरण मोहीम रावबली जात आहे, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कोरोना संपला असे न वागता, मास्कचा वापर करावा. यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगली पाहिजे. याचबरोबर आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

चौकट

गेल्या दोन दिवसात तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊन होणार असल्याने खरेदीसाठी बाजारपेठांत गर्दी होत आहे. लॉकडाऊनमध्येही किराणा, भाजीपाला तसेच अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे योग्य होणार नाही. तालुक्यात वाढणारी रुग्णांची संख्या धोक्याची घंटा आहे. बुधवारी रात्रीपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून कोरोनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून जनतेने नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Be careful! The number of corona sufferers in Jawali is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.