खबरदारी घ्या... ऑक्सिजनवाचून रुग्ण वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:41 AM2021-04-23T04:41:46+5:302021-04-23T04:41:46+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत, यासाठी ...

Be careful ... the patient should not be deprived of oxygen | खबरदारी घ्या... ऑक्सिजनवाचून रुग्ण वंचित राहू नये

खबरदारी घ्या... ऑक्सिजनवाचून रुग्ण वंचित राहू नये

Next

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असा रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी केली.

कोरोना प्रतिबंध उपाययोजना बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात झाली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात बेडची संख्या वाढवा, अशा सूचना करुन रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, १८ वर्षांपुढील युवकांसाठी १ मेपासून लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे, ही मोहीम कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य सुविधा वाढण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये ७८ बेडचे कोविड सेंटरचे काम सुरु असून, हे कोविड सेंटर येत्या दोन ते तीन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिविर औषधाचा अधिकचा पुरवठा जिल्ह्याला व्हावा, यासाठीही प्रयत्न करीत आहोत. कोरोनाची लक्षणे असूनही ग्रामीण भागातील ग्रामस्थ घरातच उपचार घेत असून, शेवटच्य क्षणी ते रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे, यासाठी शिक्षकांच्या नेमणुकाही करण्यात येणार आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत सांगितले.

फोटो ओळ : कोरेगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला सूचना केल्या.

Web Title: Be careful ... the patient should not be deprived of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.