कामगार कर्मचाऱ्यांच्या हालचालींबाबत स्पष्टपणे कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:45+5:302021-05-27T04:41:45+5:30
सातारा : अत्यावश्यक सेवेतील उद्योग व निर्यात उद्योग यातील कामगार कर्मचाऱ्यांच्या हालचालींबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्टता नसल्याने गोंधळ होत आहे. ...
सातारा : अत्यावश्यक सेवेतील उद्योग व निर्यात उद्योग यातील कामगार कर्मचाऱ्यांच्या
हालचालींबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्टता नसल्याने गोंधळ होत आहे. त्यांच्या
हालचालींबाबत स्पष्टपणे कळवावे, अशी मागणी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा
अर्थात मासच्या वतीने अध्यक्ष उदय देशमुख यांनी औद्योगिक महामंडळाकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी १९ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सातारा
औद्योगिक क्षेत्रासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात
अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना येणाऱ्या विविध अडचणी दूर करणे व अत्यावश्यक सेवेतील
उद्योगांना नियमानुसार उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचे अधिकार नोडल अधिकाऱ्यांना
आहे. याबरोबरच कामगार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुक्कामी घरापासून कामावर ये- जा करण्याच्या
हालचालींबाबत स्पष्टता आढळत नाही. ही स्पष्टता देताना उद्योग व्यवसायांना हातभार लावावा,
अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.