गटासाठी होणार गर्दी; गणांसाठी शोधाशोध !

By admin | Published: October 18, 2016 12:47 AM2016-10-18T00:47:20+5:302016-10-18T00:47:20+5:30

हिंगणगाव : फलटण तालुक्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

To be organized for the group; Search for the hunt! | गटासाठी होणार गर्दी; गणांसाठी शोधाशोध !

गटासाठी होणार गर्दी; गणांसाठी शोधाशोध !

Next

सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्की
फलटण तालुक्यातील हिंगणगाव गट खुला झाला असून, गणही खुल्या वर्गातील महिलेसाठी तर सुरवडी गण ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत गटातील निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी असणार आहे तर गणांसाठी उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे.
हिंगणगाव गट काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मागील निवडणुकीपूर्वी धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातील पाण्याचे पूजन झाले आणि चित्र पालटले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सारिका अनपट यांनी काँग्रेसच्या विमलताई साळुंखे-पाटील यांचा पराभव केला. त्यानंतरच्या कालावधीत राजकीय क्षेत्रात अनेक बदल झाले. सध्या तर आरक्षणात हिंगणगाव गट खुला झाला असून, गण महिलेसाठी तर दुसरा सुरवडी गण हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढणार आहे.
गतवेळी दिवंगत आमदार चिमरणराव कदम यांचे समर्थक दत्ता ऊर्फ धैर्यशील अनपट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्यासमोर उभे राहण्यास कोणी तयार नव्हते. दत्ता अनपट यांनी पत्नी सारिका यांच्यासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली.
प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी पत्नी विमलताई यांच्यासाठी निवडणूक लढविली. मात्र, धोम-बलकवडीचे पाणी आणि काँग्रेसमधीलच गटबाजीमुळे साळुंखे-पाटील यांना पराभव पत्करावा लागला. असे असलेतरी सुरवडी गणातून मात्र काँग्रेसचेच धनंजय साळुंखे-पाटील हे निवडून
आले.
गेल्यावेळच्या निवडणुकीनंतर राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी हिंगणगाव गटावर लक्ष केंद्रित केले. अनपट यांच्या माध्यमातून गट आणि गणात विकासकामे करण्यात आली. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी गट खुला झाला आहे.
हिंंगणगाव गण महिलेसाठी राखीव आहे. गणासाठी पंचायत समितीच्या सदस्या स्वाती भोईटे यांच्या नावाचा विचार राष्ट्रवादीकडून पुन्हा होऊ शकतो. तसेच दीपाली प्रवीण भोईटे यांच्याही नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून सीमा भोईटे दावेदार आहेत. तर सुरवडी गण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. या गणातून प्रियांका सरक, विद्या देवकर, मंजुषा भोसले यांची नावे सध्यातरी चर्चेत आहेत.
हिंगणगाव गट खुला झाल्याने दत्ता अनपट, विलासराव झणझणे, म्हस्कू अनपट, शरदराव भोईटे, अनिल भोईटे, विश्वासराव निंबाळकर सुभाषराव धुमाळ, विलासराव नलवडे, शंकरराव नलवडे, नवनाथ बोबडे, चंद्रकांत बोबडे, पंकज शिंदे यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत येत
आहेत.
काँग्रेसकडून प्रल्हादराव साळुंखे-पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय पाटील, राजेंद्र काकडे, दादासाहेब नलवडे, सुरेश भोईटे यांची नावे पुढे आली आहेत. भाजपकडून विशाल झणझणे, संजय निंबाळकर, सुरेश निंबाळकर इच्छुक आहेत. शिवसेनेकडून हणमंत बासर तर रासपकडून खंडेराव सरक दावेदार समजले जातात.
कदम गटाला नेतृत्व...
काही दिवसांपूर्वीच दिवंगत माजी आमदार चिमणराव कदम यांचा मुलगा सह्याद्री कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कदम गटाला आता नेतृत्व मिळाले आहे. परिणामी कदम गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना, भाजप, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची युती झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, महाआघाडी अशी तिरंगी लढत गटात होऊ शकते.

 

Web Title: To be organized for the group; Search for the hunt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.