Satara News: ऑर्केस्ट्रातून हाकलून दिल्याच्या रागातून मारहाण, चौघा विरोधात गुन्हा दाखल
By नितीन काळेल | Published: February 10, 2023 04:42 PM2023-02-10T16:42:25+5:302023-02-10T16:42:54+5:30
सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
सातारा : ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमातून हाकलून दिल्याच्या रागातून कापड दुकानदाराला मारहाण करुन खिशातून रोखड नेण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात चाैघा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सचिन सदाशिव चोरट (रा. काेंढवली, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. तर तक्रारीनुसार शुभम नवनाथ बरकडे, गोरख चंद्रकांत बरकडे (दोघेही रा. लिंब, ता. सातारा) आणि अभय राजे (रा. कोंढवली), अब्दूल सिध्दीगी (रा. लिंब) यांच्या विरोधात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे.
दि. ९ फेब्रवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास लिंब फाटा येथे मारहाण व जबरी चोरीचा प्रकार घडला. तक्रारदार हे दुचाकीवरुन जात असताना समोरुन येऊन संशियतांनी आॅर्केस्ट्राच्या कार्यक्रामवेळी हाकलून दिल्याच्या रागातून शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केली. तसेच जवळच पडलेले लाकडी दांडके घेऊन डोळ्याजवळ मारुन जखमी केले. त्यानंतर तक्रादाराच्या खिशातील १८०० रुपये जबरदस्तीने काढून पलायन केले.
सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक फाैजदार बागवान हे तपास करीत आहेत.