साताऱ्यात मूर्ती परत न दिल्याच्या रागातून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:38 AM2021-05-17T04:38:12+5:302021-05-17T04:38:12+5:30
सातारा : मूर्ती परत न केल्याच्या कारणावरून चिडून मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा : मूर्ती परत न केल्याच्या कारणावरून चिडून मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शंकर कालाजी सोलंखी (वय ३०, रा. बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली, सातारा. मूळ रा. राजस्थान) हा मूर्तिकार आहे. त्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मूर्ती परत न केल्याच्या रागातून चिडून एकाने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच लाकडी दांडक्याने डोके, तसेच पाठीवर मारहाण करण्यात आली. यावेळी फिर्यादीचा भाचा भांडण सोडविण्यासाठी आला तेव्हा त्यालाही मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना बाँबे रेस्टॉरंट चौकात घडली. याप्रकरणी नरेश धनाजी बाटिरा (रा. बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.
..................................................