उधारीवर सिगारेट देण्यास नकार, टपरीचालकाला केली मारहाण; अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 06:34 PM2022-02-26T18:34:33+5:302022-02-26T18:35:28+5:30

सातारा : पहिली उधारी दिल्याशिवाय सिगारेट देण्यास नकार दिल्याने पानटपरी चालकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना येथील औद्योगिक वसाहतीत ...

Beaten up for refusing to give cigarettes on loan Charges filed against three unidentified persons | उधारीवर सिगारेट देण्यास नकार, टपरीचालकाला केली मारहाण; अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल

उधारीवर सिगारेट देण्यास नकार, टपरीचालकाला केली मारहाण; अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

सातारा : पहिली उधारी दिल्याशिवाय सिगारेट देण्यास नकार दिल्याने पानटपरी चालकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना येथील औद्योगिक वसाहतीत घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेंद्र कुंडलीक पवार (रा.देगाव रोड,माने कॉलनी) यांची औद्योगिक वसाहतीमधील शासकीय दुध डेअरीजवळील शिवसाई या नावाची पानटपरी आहे. सायंकाळी पाचता तीन युवक दुचाकीवरून त्याठिकाणी आले. त्यातील एका युवकाने माने यांना उधारीवर सिगारेट मागितले.

तेव्हा पहिली उधारी दिल्याशिवाय आता काही देणार नसल्याचे माने यांनी सांगितले. या वरून त्या युवकाने माने यांना दुकानातून बाहेर ओढत दगडाने मारहाण केली. माने यांच्या तक्रारीवरून सातारा शहर पोलिसांनी अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beaten up for refusing to give cigarettes on loan Charges filed against three unidentified persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.