जमिनीच्या वादातून दाम्पत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:34+5:302021-04-24T04:40:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जागेच्या वादातून सातारा तालुक्यातील ठोसेघर येथे सावत्र भावासह त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या भाव, भावजयीस कोयता, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जागेच्या वादातून सातारा तालुक्यातील ठोसेघर येथे सावत्र भावासह त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या भाव, भावजयीस कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने हे दाम्पत्य जखमी झाले. याप्रकरणी सहाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२) दुपारी सव्वाचार वाजता यातील तक्रारदार शंकर रामचंद्र बेडेकर (वय ५५, रा. ठोसेघर, ता. सातारा) हे त्यांच्या घरासमोर उभे असताना शेजारीच राहणारा त्यांचा सावत्र भाऊ यशवंत रामचंद्र बेडेकर याने त्यांना तू माझ्या जागेत ठेवलेली लाकडे उचल असे सांगितले. मात्र, शंकर बेडेकर यांनी ही माझी जागा असून, मी लाकडे उचलणार नाही, असे म्हणाले.
यातून दोघांमध्ये वाद झाला. यशवंत बेडेकर याच्यासह रमेश यशवंत बेडेकर, आक्काताई यशवंत बेडेकर, सुलाबाई पांडुरंग जाधव, संतोष पांडुरंग जाधव, गोजाबाई रामचंद्र बेडेकर (सर्व, रा. ठोसेघर, ता. सातारा) यांनी त्यांना मारहाण केली. यामध्ये रमेश बेडेकर याने लोखंडी कोयत्याने शंकर बेडेकर यांच्यावर पायावर वार केला, तर लाकडी दांडक्याने पाठीत मारहाण केली. यावेळी शंकर बेडेकर यांची पत्नी लक्ष्मी बेडेकर भांडणे सोडविण्यास आली असताना आक्काताई यशवंत बेडेकर हिने लाकडी दांडक्याने लक्ष्मी यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक बर्गे करीत आहेत.