दाव्याचा निकाल विरोधात गेल्याने एकाला मारहाण ; तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:09 PM2020-02-25T15:09:31+5:302020-02-25T15:16:47+5:30
प्रांत कार्यालयात दाखल असलेल्या शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल विरोधात गेल्याने एकाला लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना गवडी (ता. सातारा) येथे घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : प्रांत कार्यालयात दाखल असलेल्या शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल विरोधात गेल्याने एकाला लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना गवडी (ता. सातारा) येथे घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीकांत घोरपडे, प्राजक्ता चव्हाण, सुमन घोरपडे (सर्व रा.गवडी, ता.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलास दिनकर घोरपडे (रा. गवडी, ता. सातारा) यांचा व श्रीकांत घोरपडे यांच्यात जमिनीच्या वाद आहे . त्याप्रकरणी साताऱ्यातील प्रांत कार्यालयात त्यांचा दावा दाखल होता. त्या दाव्याचा निकाल विलास घोरपडे यांच्या बाजूने लागल्याचा राग मनात धरून संशयितांनी त्यांना लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीत घोरपडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.