मुलीला ताब्यात देण्यासाठी पत्नीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:40 AM2021-03-27T04:40:53+5:302021-03-27T04:40:53+5:30
सातारा : लहान मुलीला ताब्यात देण्यासाठी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह अन्य एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला ...
सातारा : लहान मुलीला ताब्यात देण्यासाठी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह अन्य एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा दखल केलेले दोघेजण हे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी स्नेहल तानाजी गोरे (सध्या रा. खेड, सातारा. मूळ रा. कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पती तानाजी गणेश गोरे (रा. कूर्डू) आणि विठ्ठल माळी (पूर्ण नाव नाही. रा. पंढरपूर, जिल्हा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुलीला ताब्यात देण्यासाठी फिर्यादीला कारमधून नेऊन शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे हे अधिक तपास करीत आहेत.
.........................................................................