निसर्गाच्या गुढीने पश्चिम घाटाचे सौंदर्य खुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:02+5:302021-04-15T04:38:02+5:30
पेट्री : चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्वत्र साजरा केला जाणारा शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याला उभारल्या जाणाऱ्या ...
पेट्री : चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्वत्र साजरा केला जाणारा शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याला उभारल्या जाणाऱ्या गुढीच्या आकाराप्रमाणे तंतोतंत दिसणारी पश्चिम घाट उतारावर दिसणारी वनस्पती म्हणजे गुढी होय. फुलांच्या हंगामात कास पठारापासून पुढील उतारावरील गवताळ भागात ही वनस्पती प्रामुख्याने आपणास पाहावयास मिळते.
आपल्या सह्याद्री पर्वतरांगांत सर्वसाधारण उतारांवर असणाऱ्या गवताळ प्रदेशामध्ये आढळणारी ऑर्किडीसी कुळातील हंगामी वनस्पती. हिचे अस्तित्व त्या भागातील आदर्श अधिवासाचे सुचिन्ह मानले जाते. ऑगस्ट ते ऑक्टोबर या हंगामात फुलावर असते. सामान्यतः ४०-५० सेमी उंचीपर्यंत वाढते. १-२ फुले धरतात. कधीकधी ३-४ फुलांनी बहरते. फुले २-३ आठवडे टिकतात. त्याची लांबी तुलनेने जास्त असल्यामुळे या वनस्पतीचे परागीभवन ही निसर्गचक्रातील एक विस्मयकारी व आश्चर्यकारक प्रक्रिया आहे. ही गुढी पाहण्यासाठी कास पठारावरील नागरिकांनी गुढीपाडव्या दिवशी गर्दी केली होती.
कोट :
मूळ वनस्पतीचे खोड म्हणजे गुढीचा कळक. त्याच्या शेंड्यावर येणारे फुल. त्यातील हा भाग हिरवा असतो. जो की गुढीचा गडवा तांब्या पांढरा असतो. जो की शालू-खण वस्त्राचे प्रतीक तर असतो. या वनस्पतीमध्ये खूपच लांबलचक असतो. तो गुढीच्या हार आणि साखरगाठीचे प्रतीक. आपण मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करतो. अगदी त्या गुढीच्या आकाराप्रमाणे दिसणारी वनस्पती म्हणजे गुढी. या वनस्पतीला अगदी समर्पक नामकरण पाहावयास मिळते.
सुनील भोईटे - मानद वन्यजीव रक्षक, सातारा
फोटो : १४ पेट्री