भाजपमुळेच हद्दवाढीचा प्रस्ताव बारगळला

By admin | Published: September 4, 2016 11:52 PM2016-09-04T23:52:00+5:302016-09-04T23:52:00+5:30

जयवंत भोसले : सातारा पालिकेला नगरोत्थानमधून अडीच कोटींचा निधी

Because of BJP, the extension of the multi-millionaire bandh | भाजपमुळेच हद्दवाढीचा प्रस्ताव बारगळला

भाजपमुळेच हद्दवाढीचा प्रस्ताव बारगळला

Next

सातारा : ‘सातारा शहराचा विकास गतीने सुरू असून, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वेळोवेळी केंद्र आणि राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी आणून सातारा शहरातील रस्ते चकाचक केले आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून आताही नगरोत्थानमधून पालिकेला अडीच कोटींचा निधी मिळाला आहे,’ अशी माहिती उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांनी दिली.
दरम्यान, कऱ्हाड ब वर्ग नगरपालिका असताना देखील राज्य सरकारने ७ कोटी निधी दिला असून, जिल्ह्याचे ठिकाण आणि ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या सातारा पालिकेला मात्र साडेचार कोटी निधी देऊन दुजाभाव केला आहे. अंतिम टप्प्यात असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव साताऱ्यातीलच भाजपा नेत्यांमुळे बारगळा असून, स्वत:चे सरकार असूनही भाजपाच्या नेत्यांना साताऱ्यासाठी भरीव निधी उपलब्ध करता येत नाही, याचे आश्चर्य वाटते, असा टोलाही भोसले यांनी लगावला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश सर्वच शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्या तुलनेत सातारा शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार झाल्याने रस्ते चांगल्या स्थितीत आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष प्रयत्न करून केंद्र आणि राज्य शासनाकडून सातारा शहरातील रस्त्यांसाठी वेळोवेळी भरीव निधी आणला. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील आणि कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे मार्गी लागली आहेत. कामे दर्जेदार झाल्याने नुकत्याच झालेल्या जोरदार पावसानंतरही रस्ते चांगले टिकले आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून नगरोत्थानमधून अडीच कोटींचा निधी पालिकेला मिळाला असून, शहरातील उर्वरित रस्त्यांची कामेही लवकरच मार्गी लागणार आहेत.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली होती. पाठपुरावा केल्याने प्रस्ताव मंजुरी अंतिम टप्प्यात आली होती. मात्र, अखेच्या क्षणी साताऱ्यातीलच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढीमुळे आपल्याला काहीही फायदा होणार नाही, हद्दवाढीचा प्रस्ताव बाजूला ठेवा, असे सांगून मुख्यमंत्र्यांना हा प्रस्ताव मंजूर करण्यापासून परावृत्त केल्याचे ऐकायला मिळत आहे.’ (प्रतिनिधी)
साताऱ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची ताकद कमी
निवडणुकीपुरत्या फुशारक्या न मारता राज्य आणि केंद्रातील सत्तेचा फायदा भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शहराच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते. मात्र, सातारा पालिकेपेक्षा कऱ्हाडला जादा निधी दिला गेल्याने साताऱ्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची ताकद कमी पडली, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. अडीच वर्षांनंतर का होईना साडेचार कोटींच्या निधीची तरतूद सातारा पालिकेसाठी युती सरकारने केली आहे. निधी कोणी दिला हे महत्त्वाचे नाही, तर मिळणाऱ्या निधीचा विनियोग शहराच्या विकासासाठी करणे हे पालिकेचे कर्तव्य असून, त्यात कधीही कसूर झालेली नाही, असेही भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.
 

Web Title: Because of BJP, the extension of the multi-millionaire bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.