युरोप, अमेरिकेपेक्षा चांगल्या दर्जाचे संग्रहालय व्हावे : बाबासाहेब पुरंदरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:22 PM2019-06-03T23:22:25+5:302019-06-03T23:22:33+5:30
सातारा : ‘शिवरायांच्या कालखंडातील अनेक शोधक वस्तू आहेत. संग्रहालयात त्याची उत्तम प्रकारे मांडणी करून त्याकाळी घडलेल्या घटनांचा इतिहास समोर ...
सातारा : ‘शिवरायांच्या कालखंडातील अनेक शोधक वस्तू आहेत. संग्रहालयात त्याची उत्तम प्रकारे मांडणी करून त्याकाळी घडलेल्या घटनांचा इतिहास समोर आला पाहिजे. आपल्या येथील संग्रहालये ही युरोप, अमेरिकेतील संग्रगहालयांपेक्षा चांगल्या दर्जाचे असले पाहिजे,’ असे मत महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.
साताऱ्यातील नूतन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार उदयनराजे भोसले, बांधकाम विभागाचे उपअधीक्षक अभियंता आर. टी. अहिरे, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक उदय सुर्वे, महावितरणचे उपअभियंता सुनील माने यांच्यासह विविध खात्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुरंदरे म्हणाले, ‘शिवकालीन वस्तूंसोबत तत्कालीन प्रसंगावर आधारित असलेली चित्रे भिंतीवर लावावीत. त्यांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास चित्रांच्या माध्यमातून उतरणे गरजेचे आहे. ज्या काही आपल्या जुन्या संग्रहालयात वास्तू आहेत, त्याची योग्य पद्धतीने मांडणी होणे गरजेचे आहे.’
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘शिवाजी संग्रहालय राजवाडा येथील वाड्यात स्थलांतरित करावे. ती संग्रहालयास शोभेल अशी वास्तू आहे. बांधकाम पूर्ण होऊन आता सात वर्षे झाले तरी अद्याप इंटिरिअर काम अपूर्ण आहे. हा सर्व पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा आहे.’
यावेळी ‘या इमारतीचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. परंतु अंतर्गत डिझाईनला वेळ लागला आहे,’ असे उत्तर पुरातत्व अधिकाºयाने दिले असता उदयनराजे यांनी ‘सात वर्षे झाली हे काम रखडले आहे. या सात वर्षांत सात पोरं काढून झाली असती,’ असे उत्तर दिले. ‘तुम्ही कामात हलगर्जीपणा करत आहात.