जिल्ह्यातील भिक्षेकऱ्यांनाही मिळणार कोरोना लस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:56+5:302021-03-30T04:22:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, यासाठी आधारकार्ड महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे आधारकार्ड नसल्याने भिक्षेकरी ...

Beggars in district will also get corona vaccine! | जिल्ह्यातील भिक्षेकऱ्यांनाही मिळणार कोरोना लस!

जिल्ह्यातील भिक्षेकऱ्यांनाही मिळणार कोरोना लस!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, यासाठी आधारकार्ड महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे आधारकार्ड नसल्याने भिक्षेकरी यांना लस मिळणार का? याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘आधारकार्ड नाही, भिक्षेकरी यांना लस कशी देणार! असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तानंतर मंत्रालयस्तरावर हालचाली होऊन भिक्षेकऱ्यांना लस मिळण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.

सातारा जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्षांपर्यंतच्या कोमॉर्बिड लोकांना लस देण्यात येत आहे. यासाठी नोंदणी आवश्यक ठरली आहे. यासाठी आधारकार्ड महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्याआधारे संबंधितांना कोरोना लसीकरण करण्यात येते. जिल्ह्यात भिक्षेकरी आणि बेघर असणारे अनेक जण आहेत. त्यांच्याकडे आधारकार्ड नाही, तसेच इतर कागदपत्रेही नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोना लस घेता येत नसल्याचे वास्तव होते. यामधील अनेक जण तर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांच्या सेवा केंद्रात आहेत.

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्रालयस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. संस्थेच्या साहाय्याने आधारकार्ड बनवायचे का, दुसरा काही पर्याय निर्माण करायचा यावर विचार सुरू आहे. त्यामुळे यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर भिक्षेकरी यांना कोरोना लस मिळणार आहे. यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

चौकट :

जिल्ह्यात अंदाजे भिक्षेकरी ७०

.........................................

बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या

अंदाजे १२५

महिला २५

पुरुष १००

कोट :

जिल्ह्यात अनेक भिक्षेकरी आणि बेघर आहेत. काही जण सामाजिक संस्थांमध्ये राहतात. यातील अनेक जण ६० वर्षांवरील आहेत. त्यांना कोरोना लस मिळायला हवी. पण, आधारकार्डाची अडचण होती. आता शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्याने त्यांनाही लस मिळू शकते, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

- रवी बोडके, यशोधन ट्रस्ट, वेळे

.........................................................................

Web Title: Beggars in district will also get corona vaccine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.