सातारा जिल्ह्यात लाडक्या बहिणी ठरविणार उमेदवारांचे भवितव्य, महिला मतदार किती.. जाणून घ्या

By सचिन काकडे | Published: October 23, 2024 07:24 PM2024-10-23T19:24:27+5:302024-10-23T19:25:01+5:30

सचिन काकडे सातारा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यंदाच्या निवडणुकीत ''लाडक्या बहिणी'' उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. कारण ...

Beloved sisters will decide the fate of candidates in Satara district, know how many women voters. | सातारा जिल्ह्यात लाडक्या बहिणी ठरविणार उमेदवारांचे भवितव्य, महिला मतदार किती.. जाणून घ्या

सातारा जिल्ह्यात लाडक्या बहिणी ठरविणार उमेदवारांचे भवितव्य, महिला मतदार किती.. जाणून घ्या

सचिन काकडे

सातारा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यंदाच्या निवडणुकीत ''लाडक्या बहिणी'' उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. कारण जिल्ह्यात २६ लाख २८ हजार मतदारांपैकी तब्बल १२ लाख ९७ हजार तरुणी व महिलामतदानाचा हक्क बजावणार आहेत.

विधानसभेचा बिगुल वाजल्यापासून राज्यासह सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविले जात आहे. युतीकडून पहिल्या टप्प्यात आठपैकी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. परंतु आघाडीकडून अजूनही उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

युतीचे निवडणुकीतील सर्व चेहरे समोर आल्यानंतरच आघाडीकडून आपले मोहरे बाहेर काढले जातील, असे सध्याचे चित्र आहे. यंदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने या निवडणुकीत मतदारांचाच कौल निर्णायक ठरणार आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण, वाई, सातारा, कोरेगाव, माण, पाटण, कऱ्हाड उत्तर व कऱ्हाड दक्षिण या आठ मतदारसंघांतील मतदारांची संख्या २६ लाख २८ हजार ८७१ इतकी आहे. यामध्ये महिला मतदारांची संख्या तब्बल १२ लाख ९७ हजार ५०५ इतकी आहे. हीच मते यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.

मते कोणाच्या पारड्यात?

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. महिलांसाठी ''लाडकी बहीण'' योजना सुरू करण्यात आली. परंतु दुसरीकडे मोफत गॅस सिलिंडर व मुलींच्या मोफत शिक्षणाचा प्रश्न अधांतरीच राहिला. विरोधकांनीदेखील या योजनेवरून रान पेटवले असून, यंदा तरुणी व महिला उमेदवारांची मते नेमकी कोणाच्या पारड्यात पाडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सातारा जिल्ह्यातील मतदार

मतदारसंघ - पुरुष - महिला

फलटण - १,७२,४५९ - १,६५,९९१
वाई - १,७३,२२८ - १,७२,७९८
कोरेगाव - १,६१,७२० - १,५७,०६८
माण - १,८३,१०१ - १,७४,७३१
कऱ्हाड उत्तर - १,५४,७४७ - १,५०,०१९
कऱ्हाड दक्षिण - १,५९,०७७ - १,५४,१७१
पाटण - १,५६,१०० - १,५२,२५१
सातारा - १,७०,८२२ - १,७०,४७६
एकूण - १३,३१,२५४ - १२,९७,५०५.

Web Title: Beloved sisters will decide the fate of candidates in Satara district, know how many women voters.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.