आदकीर्तील बेंदूर सणावर सावट
By admin | Published: July 6, 2017 01:01 PM2017-07-06T13:01:08+5:302017-07-06T13:01:08+5:30
पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त
आॅनलाईन लोकमत
आदर्की (जि. सातारा), दि. ५ : आदर्की परिसरास मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरवली. तरीही परिसरातील शेतकऱ्यांनी हंगाम वाया जाऊ नये म्हणून मृग नक्षत्रातील रिमझिम पावसावर पेरणी केली. पण अचानक पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. याचे सावट बळीराजाच्या बेंदूर सणावर झालेला पाहायला मिळत आहे.
आदर्की परिसर निसर्गाच्या लहरीपणावर शेतकरी शेती करत होता. त्यामुळे पाऊस पडला तर पेरणी होत होती. गेल्या पाच सहा वर्षांपासून आदर्की परिसरात घोम बलकवडीचे पाणी उजव्या कालव्यातून सोडले जाऊ लागले. ओढे नाल्यांतून पाणी पाझर तलाव भरून घेण्यासाठी पाणीपट्टी लोक वर्गणीतून भरली जात होती.
पाणीसाठा वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडे बैलांबरोबरच टॅक्टरची संख्या वाढली. यावर्षी जानेवारी व मार्च महिन्यात थोम बलकवडी कालव्यात सोडले पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व राजकीय श्रेयवादातील पाणी पूजनामुळे मुळीकवाडी, हिंगणगाव धरण त्याबरोबर पाझर तलाव नाला बांध सिमेट बंधारे यात पाणी सोडले नाही.
त्यामुळे बागायती पिके वाळून गेली. त्यातच मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मृगात रिमझिम पाऊस झाला. भविष्यात चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, चवळी, घेवडा आदी खरीपाची पेरणी केली.
आता पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सजार्राजाचा सण बैदूर चार दिवसांवर आला असताना शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.