जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचा विद्यार्थिनींना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:39 AM2021-09-19T04:39:59+5:302021-09-19T04:39:59+5:30
सातारा : महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात राबविण्यात येणारा महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प विद्यार्थिनींसाठी ...
सातारा : महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात राबविण्यात येणारा महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांची भेट घेऊन आभार मानले आहेत.
सातारा जिल्ह्यात गृह आणि विविध विभागांच्या समन्वयातून महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते.
देसाई हे या प्रकल्पाविषयी वेळावेळी आढावा घेऊन मार्गदर्शनही करतात. हा प्रकल्प सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील महिला व तरुणींवरील अत्याचारांचे प्रमाणही कमी झाले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी देसाई यांची भेट घेऊन महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे आत्मविश्वास वाढल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आहेत.
फोटो ओळ : सातारा येथे महिला सुरक्षा प्रकल्प राबविल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांचा मुलींनी सत्कार केला.