साताऱ्यातील बैतूल माल कमिटी अतिवृष्टीग्रस्तांसाठी धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:07+5:302021-08-13T04:44:07+5:30
सातारा : जिल्ह्यातील बैतूल माल कमिटी चिपळूण येथील तीन गावांतील ४२७ कुटुंबीयांना पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या संसार उभारण्यासाठी मदत करत ...
सातारा : जिल्ह्यातील बैतूल माल कमिटी चिपळूण येथील तीन गावांतील ४२७ कुटुंबीयांना पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या संसार उभारण्यासाठी मदत करत असल्याचे कमिटीचे अध्यक्ष बाबाशेठ तांबोळी यांनी सांगितले.
साताऱ्यातील बैतूल माल कमिटीचे सदस्य मागील आठवड्यात चिपळूण येथील या तीन गावांना भेटी दिल्या होत्या. गरजेनुसार येथील ४३७ घरांतील कुटुंबीयांना संसार उभारण्यासाठी मदत करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कमिटीमार्फत मुस्लीम बांधवांना आव्हान करण्यात आले होते. त्यानुसार सर्वांच्या मदतीने या कुटुंबीयांना संसार उभे करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे वितरण करण्यात आले, अशी माहितीदेखील कमिटीच्या वतीने देण्यात आली. जीवनावश्यक सर्व साहित्य, स्वयंपाकासाठी भांड्याचा सेट, गॅस शेगडी, लायटर,जेन्ट्स २, ट्रॅक पॅन्ट व २ टी-शर्ट, लेडीज २ गाऊन, २ सोलापुरी चादर, २ बेडशीट, ताडपत्री २, एलईडी बल्ब असे साहित्य प्रतिकुटुंब देण्यात आले.
फोटो ओळ : सातारा येथील बैतूल माल कमिटीतर्फे चिपळूण येथील अतिवृष्टीग्रस्त भागाला साहित्य पाठविण्यात आले.
फोटो नेम : ०९ जावेद