सातबारा दुरुस्तीसाठी भजन आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:00+5:302021-03-31T04:40:00+5:30
सातारा : सातारा तालुक्यातील देगाव (पाटेश्वर) येथील तुकाराम गणपत मांढरे यांनी सात बारा उतारा दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू ...
सातारा : सातारा तालुक्यातील देगाव (पाटेश्वर) येथील तुकाराम गणपत मांढरे यांनी सात बारा उतारा दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. याचबरोबर मांढरे हे उपोषणस्थळी भजनही करीत आहेत.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, प्रशासनाच्या चुकीमुळे सात बारा चुकीचा झाला आहे. यामुळे आम्ही ११ माणसे गुन्हेगार म्हणून वावरत आहोत. माझे वय ६६ असून उर्वरित आयुष्य आनंदाने जगायचे आहे. यासाठी सात बारा दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे आटोकाट प्रयत्न केले आणि करतही आहे. मात्र, प्रशासन आपली चूक न सुधारता कायद्याने दिलेल्या अधिकाराचा दुरूपयोग करीत आहे. यासाठी आपण संबंधित व्यवस्थेस सूचना कराव्यात. तसेच सात बारा दुरुस्त करुन मिळावा.
फोटो ओळ : सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुकाराम मांढरे यांनी सात बारा उतारा दुरुस्तीसाठी भजन करीत आंदोलन सुरू केले आहे. (छाया : जावेद खान)
.................................................