भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा, डोंगर-दऱ्यांमधून वाहतंय पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:41 PM2022-07-26T12:41:46+5:302022-07-26T12:41:55+5:30
भांबवलीच्या धबधब्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून विहंगम दृश्य खास लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे.
सातारा - निसर्गाचं वरदान लाभलेला सातारा जिल्हा. निरनिराळ्या दुर्मिळ फुलांचे कास पठार, कास तलाव, पाचगणी महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणे आणि ठोसेघर धबधबा अशी अनेक ठिकाणे सातारा जिल्ह्यात प्रेक्षणीय आहेत. याच सातारा जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळख असलेला भांबवली धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
भांबवलीच्या धबधब्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून विहंगम दृश्य खास लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे. भांबवली धबधबा हा आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा असून याची उंची तब्बल 1840 फूट. MTDC च्या अधिकृत वेबसाइट हि माहिती देण्यात आली आहे. 3 टप्यांमध्ये कोसळणारा हा धबधबा भारतातील सर्वात उंच आणि सुंदर धबधबा आहे. या ठिकाणी निसर्गाची मुक्त हस्ताची उधळण पाहून पर्यटक स्तब्ध होतो. पावसाळ्यात अनेक छोटे मोठे धबधबे या ठिकाणी आपणास पाहायला मिळतात.घनदाट झाडी, दाट धुके आणि आभाळातून कोसळणारा जोराचा पाऊस असे वातावरण कोणाला आवडणार नाही.अनेक हौशी आणि ट्रेकिंगची आवड असलेले पर्यटक या ठिकाणी येत असतात. एवढा सुंदर आणि निसर्गाने नटलेला हा धबधबा मात्र अनेक अडचणी आणि समस्यांमुळे दुर्लक्षित राहिला आहे.