कऱ्हाडात ‘जनशक्ती’कडून भोसलेंचे स्वागत... राजकीय वर्तुळात ठरला चर्चेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:16 AM2018-05-31T00:16:39+5:302018-05-31T00:16:39+5:30
प्रमोद सुकरे ।
कºहाड : ‘राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेल्या अतुल भोसलेंची कºहाडात दमदार ‘एन्ट्री’ झाली. मतदारसंघात प्रवेश केल्यापासून कार्यकर्त्यांनी कौतुकांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे कºहाडात तर अख्खी ‘जनशक्ती’ भोसलेंच्या स्वागताला हजर होती. या नगरसेवकांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली नाही तर नवलच !
येथील कृष्णा उद्योग समूहाच्या डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याच्या निर्णयावर मुंबईत शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर भोसले कºहाडात आले. त्यांच्या स्वागताची भाजप कार्यकर्त्यांनी तयारी तर केली होतीच. कºहाड शहरात भोसलेंचे आगमन होताच शहरातील भाजप नगरसेवकांसह जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांचे कोल्हापूर नाक्यावरच पुष्पहार घालत स्वागत अन् कौतुक केले.
पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाखालील जनशक्तीचे नगरसेवक अतुलबाबांच्या स्वागताला हजर झाल्याने त्याची कºहाड शहरासह तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या स्वागतासाठी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, महेश कांबळे, किरण पाटील यांच्यासह महिला नगरसेविकांच्या परिवारातील निशांत ढेकळे, सुरेश पाटील, ओंकार मुळे, राहुल खराडे, विनोद भोसले, प्रीतम यादव, शिवराज इंगवले आदींची उपस्थिती होती. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे हेही स्वागताच्या नियोजनात अग्रेसर होते.
दोन बाबांची गळाभेट
राज्यमंत्री डॉ. अतुल भोसले यांचे जनशक्तीच्या नगरसेवकांनी स्वागत केल्यानंतर राजेंद्रबाबा यादव अन् डॉ. अतुलबाबा यांनी एकमेकांना अलिंगन देत या निवडीचा आनंद व्यक्त केला. त्यावेळी उपस्थितांच्या नजरा या गळाभेटीवर खिळल्या होत्या.
..ही तर अनोखी भेट
डॉ. सुरेश भोसले यांचा बुधवारी वाढदिवस होता; पण त्यांनी तो कधीही सार्वजनिकपणे साजरा केलेला नाही. त्यामुळे हार, तुरे, भेटवस्तू स्वीकारणे तर दूरच; पण पुत्र डॉ. अतुल भोसले यांना मिळालेले राज्यमंत्री पद ही त्यांच्या वाढदिनी मिळालेली अनोखी भेट असल्याची चर्चा कार्यकर्त्यांच्यात सुरू होती.