साताऱ्यात ९ एप्रिलला ‘भारत श्री’
By admin | Published: March 31, 2015 10:46 PM2015-03-31T22:46:39+5:302015-04-01T00:02:41+5:30
महिला अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचे पहिल्यांंदाच आयोजन
सातारा : इंडियन बॉडी लिल्डिंग अॅन्ड फिटनेस फेडरेशन व छत्रपती चॅरेटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत गोपीनाथ मुंढे यांच्या स्मरणार्थ ५५ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव ‘भारत श्री’ व दहावी ‘मिस भारत श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा दि. ९ ते १२ एप्रिल या कालावधीत येथील तालीम संघाच्या मैदानावर या स्पर्धा होणार असल्याची माहिती फेडरेशनचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे तसेच रवींद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धा दहा गटांमध्ये होणार आहेत. ५५ किलो ते १०० किलोवरील १० वजनी गटांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. मिस भारत स्पर्धेत दोन गटात महिला शरीरसौष्ठवपटूंच्या स्पर्धा होतील. भारत श्री विजेत्याला १ लाख ५० हजार रुपये रोख तसेच बुलेट दुचाकी देऊन गौरविण्यात येणार आहे.महिलांच्या दोन गटामधील फिटनेस व बॉडीबिल्डिंग मिस भारत स्पर्धेत अनुक्रमे पाच पारितोषिके देण्यात येणार आहेत. गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदकाने विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. देशभरातून सुमारे २७ राज्यातून पाचशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)