विनयभंगप्रकरणी भुईंजच्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:02 AM2021-05-05T05:02:34+5:302021-05-05T05:02:34+5:30
सातारा: वाई तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भुईंज येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात ...
सातारा: वाई तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भुईंज येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. मिलिंद खरात आणि चंद्रकांत खरात अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही वाई तालुक्यातील एका गावातील असून, मिलीिद चंद्रकांत खरात, चंद्रकांत धोंडिबा खरात (दोघे रा. भीमनगर, भुईंज, ता. वाई) या दोघांनी पीडित महिलेस घाणेरडी शिवीगाळ करत मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी या दोघांनी पीडित महिलेच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलिंद खरात आणि चंद्रकांत खरात या दोघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार तोडरमल करत आहेत.