बनवडी येथील पार्लेनगर परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:20+5:302021-06-30T04:25:20+5:30
कोपर्डे हवेली : बनवडी ता. कऱ्हाड येथील पार्लेनगर परिसर येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या फंडातून मंजूर झालेल्या ...
कोपर्डे हवेली : बनवडी ता. कऱ्हाड येथील पार्लेनगर परिसर येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सुशोभीकरण कामाचे सरपंच प्रदीप पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, नरहरी जानराव, आख्तर आत्तार, विद्या शिवदास, पल्लवी साळुंखे, स्वाती गोतपागर, अश्विनी विभुते, विलासराव खापे, अशोक मोहने, संपतराव माळी, विजय चव्हाण, दादासाहेब माळी उपस्थित होते.
बनवडी गाव हे कऱ्हाड शहरानजीक असल्याने लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे राबवण्यात येत आहेत. जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या निधीतून पाच लाख रुपये सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पार्लेकर परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी अनेक वृद्ध लोक विश्रांतीसाठी येत असतात. या ठिकाणी पेव्हर ब्लाॅक बसवण्यात येणार आहेत.