सदगुरू पथाचे नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:18+5:302021-01-22T04:35:18+5:30
..................................................... वातावरणात बदल; पिकाला धोका लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आली असून, ढगाळ वातावरणामुळे ...
.....................................................
वातावरणात बदल; पिकाला धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आली असून, ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकाला धोका निर्माण झाला आहे. गहू, हरभरा, ज्वारी पिकांसाठी सध्या वाढीचा काळ आहे. ज्वारी पोटऱ्यात असून, हरभऱ्याला घाटी लागण्यास सुरुवात झाली आहे. या दिवसात पोषक वातावरण लाभले तर उत्पादकताही वाढते. गहू, हरभरा या पिकांना कडाक्याची थंडी पोषक असते. मात्र, यावर्षी वातावरणात आमूलाग्र बदल झाला आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडत आहे. थंडी तर गायब झाली आहे. त्यामुळे हरभरा पिकाला चांगलाच फटका बसणार आहे.
ढगाळ हवामानामुळे फुलोरा गळत असल्याने कमी संख्येने घाटे लागत आहेत. त्यामुळे यंदा हरभऱ्यासह गहू, ज्वारी पिकाला धोका निर्माण झाला आहे.