बनवडीच्या चोवीस बाय सात योजनेच्या विजेच्या फिडरचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:32+5:302021-05-26T04:38:32+5:30
कोपर्डे हवेली : बनवडी येथील ग्रामपंचायतीने चोवीस बाय सात नळपाणी पुरवठा योजना सहा ते सात वर्षांपासून कार्यान्वित केली. सतत ...
कोपर्डे हवेली : बनवडी येथील ग्रामपंचायतीने चोवीस बाय सात नळपाणी पुरवठा योजना सहा ते सात वर्षांपासून कार्यान्वित केली. सतत विजेच्या तांत्रिक घोटाळ्यामुळे पाणी टंचाई जाणवत होती. त्यामुळे नवीन फिडरची वीजवितरण कंपनीने मंजुरी दिली. त्याचे परिषद सदस्य सागर शिवदास यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रदिीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळ, संदीप साळुंखे, कपिल जाधव, योगेश गोतपागर, नितीन जाधव, नवनाथ करांडे, मयूर जाधव उपस्थित होते.
पूर्वीचा वीज पुरवठा नदीपात्रातील जॅकवेलसाठी सैदापूर फिडरवरून होता. तर पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी वीजपुरवठा कोपर्डे हवेली फिडरवरून होता. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांवरून वीज पुरवठा होत असल्यामुळे एखाद्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही ठिकाणी दिसत होता. त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई जाणवत होती.
त्यासाठी ग्रामपंचायतीने कोपर्डे हवेली फिडरवरून एकाच गावावरून वीजपुरवठा व्हावा, आशी मागणी वीज वितरण कंपनीकडे केली होती. त्याची दखल घेऊन कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, उपकार्यकारी अभियंता नवाळे यांनी कार्यवाही केली. दोन्ही ठिकाणी एकाच गावातील फिडरवरून वीज मिळणार असल्याने तांत्रिक पाणीपुरवठ्याच्या अडचणी कमी होणार आहेत. त्याचा परिणाम पाणी वितरण व्यवस्थेवर होणार नाही.