लोणंदला आज विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:44+5:302021-09-26T04:42:44+5:30

लोणंद : लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोणंद शहरामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व पदग्रहण समारंभ रविवार, दि. २६ रोजी दुपारी ...

Bhumipujan of development works to Lonand today | लोणंदला आज विकासकामांचे भूमिपूजन

लोणंदला आज विकासकामांचे भूमिपूजन

Next

लोणंद : लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोणंद शहरामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व पदग्रहण समारंभ रविवार, दि. २६ रोजी दुपारी चार वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते होत आहे.

त्यामध्ये बाळासाहेब घाडगे घर प्रभाग क्रमांक १७ येथील रस्त्याचे डांबरीकरण (३० लाख) प्रभाग क्रमांक १३ येथील दुर्गामाता क्रमांक एक खेमावती नदीपर्यंत बंदिस्त गटाराचे काम (१४ लाख) प्रभाग क्रमांक १४ प्रवीण शहा घरासमोर रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार (१३ लाख) प्रभाग क्रमांक १५ प्रसूतिगृह ते सुरेश जावळे घर ते सलीम इनामदार घरापर्यंत बंदिस्त गटर (१२ लाख), प्रभाग क्रमांक सात संभाजी क्षीरसागर ते खेमावती नदीपर्यंत र बंदिस्त गटर (१५.४० लाख) प्रभाग क्रमांक १६ जि. प. मराठी शाळा हायमास पथदिवे व रस्ता डांबरीकरण, दत्तात्रय कचरे घर ते नलवडे घर व बारटक्के घर ते नामदेव जाधव घर (१७.८० लाख) मेघराज यादव घरासमोर प्रभाग क्रमांक चार हायमास पथदिवा (१.८० लाख), प्रभाग क्रमांक ३ शहीद जवान संतोष ठोंबरे, नंदाताई गायकवाड घर ते झारेकरी वसाहत डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईट (१७ लाख) झारेकरी वसाहत प्रभाग क्रमांक ३ रस्ता अनिल ठोंबरे ते कोरेगाव रस्ता डांबरीकरण (१२ लाख) या कामांचा भूमिपूजन समारंभ होणार असून सायंकाळी साडेपाच वाजता अमृता मंगल कार्यालय लोणंद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंभर कार्यकर्त्यांचा पदग्रहण समारंभ घेण्यात येणार आहे.

अशी माहिती सातारा जिल्हा समन्वय समितीचे सदस्य डॉ. नितीन सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद खरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हणमंत शेळके पाटील, माजी सभापती विनोद दादा क्षीरसागर उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of development works to Lonand today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.