स्वातंत्र्यसैनिक भवनाचे खटावमध्ये भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:48+5:302021-08-23T04:41:48+5:30
खटाव : ‘खटावमध्ये देशाची सेवा करणाऱ्या जवानांची संख्या बरीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खटावमधील आजी-माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीने खटावमध्ये ...
खटाव : ‘खटावमध्ये देशाची सेवा करणाऱ्या जवानांची संख्या बरीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खटावमधील आजी-माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीने खटावमध्ये स्वतंत्र सैनिक भवन असावे, हा विचार मांडला होता.
या विचाराला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी मूर्त स्वरूप आले. स्वातंत्र्यसैनिक भवनाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
गेल्या कित्येक वर्षांपासून जागेअभावी हे भवन कोठे उभे करावयाचे, हा प्रश्न खटाव ग्रामपंचायतीने निकालात काढला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने शास्त्रीनगर परिसरातील मराठा चौकात महाविद्यालयाशेजारी सैनिक भवनसाठी जागा उपलब्ध करून दिली. याचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कॅप्शन २२खटाव
खटावमध्ये सैनिक भवनचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहील पाटील, सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)