भुर्इंजचा तलाठी जाळ्यात

By admin | Published: December 26, 2014 11:17 PM2014-12-26T23:17:08+5:302014-12-26T23:46:29+5:30

‘लाचलुचपत’ची कारवाई : पंधराशेची लाच घेताना पकडले

Bhuntjunga Talathi's trap | भुर्इंजचा तलाठी जाळ्यात

भुर्इंजचा तलाठी जाळ्यात

Next

सातारा : सात-बारावर वारस नोंद करण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच घेताना भुर्इंज येथील तलाठी प्रशांत यशवंत इंगवले यास आज, शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दरम्यान, तलाठी इंगवले याच्यावर भुर्इंज पोलीस ठाण्यात लाच प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ी, तक्रारदाराच्या आजीचे निधन झाले असून, त्यांच्या वारसदारांची सात-बारा उताऱ्यावर नोंद करून तसा सात-बारा देण्यासाठी भुर्इंज सजाचे तलाठी प्रशांत इंगवले (वय ३८, रा. न्यू सातारा नगर, फ्लॅट नंबर एस. टी. २, वाई, ता. वाई, जि. सातारा) याने दोन हजार
रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर इंगवले याने पंधराशे रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि पैसे घेताना त्यास रंगेहात पकडले. (प्रतिनिधी)

घराची झडती
भुर्इंज सजाचे तलाठी प्रशांत इंगवले याचा वाई येथे न्यू सातारा नगरमध्ये फ्लॅट आहे. त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बी. एस. कुरळे आणि त्यांचे सहकारी रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झडती घेत होते. यामध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्रे असल्याचे समजते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वैशाली पाटील करीत आहेत.

Web Title: Bhuntjunga Talathi's trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.